Marathi News> मनोरंजन
Advertisement

Vivek Lagoo Passed away: दिग्गज अभिनेते विवेक लागू यांचे निधन; वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Vivek Lagoo Passed away: प्रसिद्ध अभिनेत्री दिवंगत रीमा लागू (Late veteran actress Reema Lagoo) यांचे माजी पती विवेक लागू यांचे 19 जून रोजी निधन झाले. ते 74 वर्षाचे होते.     

Vivek Lagoo Passed away: दिग्गज अभिनेते विवेक लागू यांचे निधन; वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Actor Vivek Lagoo passed away at the age of 74: दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचे माजी पती विवेक लागू यांचे 19 जून रोजी वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले. विवेक यांच्या निधनाची बातमी पत्रकार विकी लालवानी यांनी शेअर केली. दरम्यान, त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अजून समोर आलेलं नाही. वृत्तानुसार, विवेक यांच्यावर २० जून रोजी अंत्यसंस्कार होतील. त्यांचे अंतिम संस्कार ओशिवरा स्मशानभूमीत केले जातील. विवेक लागू हे प्रसिद्ध अभिनेत्री दिवंगत रीमा लागू यांचे माजी पती होते.

काही वर्षांपासून माध्यमांपासून लांब 

विवेक लागू यांनी गेल्या काही वर्षांपासून माध्यमांपासून दूर राहणं पसंत केलं होतं, पण तरीही त्यांनी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमठवला होता. ‘Ugly’, ‘What About Savarkar?’ आणि ‘31 दिवस’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला होता.

रीमा आणि विवेक लागू यांची पहिली भेट

रीमा आणि विवेक लागू यांची पहिली भेट 1976 मध्ये एका बँकेत काम करताना झाली होती. तिथूनच त्यांच्या नात्याची सुरुवात झाली. दोन वर्षांच्या ओळखीनंतर त्यांनी 1978 मध्ये लग्न केलं. मात्र पुढे काही वर्षांनी त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.  विवेक लागू आणि रीमा लागू यांना मृण्मयी लागू वैकुल ही एक मुलगी आहे. तिने आपल्या आई-वडिलांच्या कलेच्या परंपरेला पुढे नेलं आहे. लेखिका आणि दिग्दर्शिका म्हणून मृण्मयीने ‘थप्पड’ आणि ‘स्कूप’सारख्या प्रोजेक्ट्सवर काम केलं असून ती सध्या आधुनिक भारतीय सिनेसृष्टीतील एक महत्त्वाचा आवाज बनली आहे.

शेवटचा आधारही हरपला

विवेक लागू यांच्या निधनाने लागू कुटुंबातील शेवटचा आधारही हरपला. रीमा लागू यांचे निधन 2017 मध्ये अचानक हृदयविकाराच्या झटक्याने झाले होते. त्यावेळी त्यांनी ‘नामकरण’ या मालिकेचं शूटिंग पूर्ण केलं होतं आणि त्यानंतर त्यांना छातीत दुखू लागल्यामुळे रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

विवेक लागू यांचा अंतिम संस्कार 20 जून रोजी ओशिवरा स्मशानभूमीत होणार आहे. याच स्मशानभूमीत रीमा लागू यांच्यावरही अंत्यसंस्कार झाले होते.

Read More