Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्याचा साधेपणा, 199 रूपयांची चप्पल घालून पोहोचला चित्रपटाच्या प्रमोशनला


100 करोड बजेटच्या चित्रपटात लीड रोडची भूमिका साकारणाऱ्या 'या' अभिनेत्याने घातली 199 रूपयांची चप्पल, कोण आहे हा स्टार? 

अभिनेत्याचा साधेपणा, 199 रूपयांची चप्पल घालून पोहोचला चित्रपटाच्या प्रमोशनला

मुंबई : अभिनेता म्हटलं तर लाईमलाईट, चारही बाजूंना कॅमरे, मीडियाचा गराडा आलाच, मात्र या सर्व गोष्टींची पर्वा न करता एक अभिनेता थेट 199 रूपयांची चप्पल घालून चित्रपटाच्या प्रमोशनला पोहोचलाय. विशेष म्हणजे या अभिनेत्याच्या कृतीने तो ट्रोल नाही तर खुपच चर्चेत आला आहे. 

दक्षिणेतील तारे त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जातात. मग तो प्रभास असो, रजनीकांत असो की विजय देवरकोंडा. बॉलीवूडच्या लाईमलाईटपासून दूर, दक्षिणेतील तारे फक्त रुपेरी पडद्यावर चमकतात. वास्तविक जीवनात लाईमलाईटपासून दूर साधे राहणे पसंत करतात. हा कित्ता आता विजय देवरकोंडा गिरवताना दिसतोय. 

विजय देवरकोंडा सघ्या लिगर चित्रपटामुळे चर्चेत आहे. याच चित्रपटाचा मुंबईत ट्रेलर ल़ॉंच सोहळा गुरुवारी पार पडला. या ट्रेलर लॉंट सोहळ्यात विजय देवरकोंडाचा साधेपणा सर्वांनाच आवडला. साउथ स्टार या कार्यक्रमात कॅज्युअल लूकमध्ये पोहोचला होता. 

विजयचा लुक 
विजय देवराकोंडा यांनी टी-शर्ट-कार्गो पँटसह चप्पल घातली होती. रणवीर सिंगने चप्पल घालण्याबद्दल विजय देवरकोंडाचे कौतुक केले. त्याच्या स्वॅगला सलाम देखील ठोकला होता. मीडिया रिपोर्टनुसार त्याने या सोहळ्यात घातलेली चप्पल ही फक्त 199 रुपयांची होती. त्यामुळे त्याच्या कपड्यांसह त्याच्या चप्पलेचीही चर्चा रंगली होती. 

खऱंतर ट्रेलर ल़ॉंच सोहळ्यात अभिनेते-अभिनेत्री नेहमीच स्टाईलीश क़ॉस्ट्युमध्ये पोहोचत असतात. मात्र विजयने आपल्या साधेपणाने लावलेली हजेरी लोकांची मने जिंकून गेली आहेत.

Read More