Marathi News> मनोरंजन
Advertisement

मराठी कलाजगतातील Best Friends अडकतायत लग्नाच्या बेडीत; तिच्या गाली लागली हळद

जुईलीच्या गाली रोहितच्या नावाची हळद; मराठी कलाजगतातील Best Friends चं लग्नं  

मराठी कलाजगतातील Best Friends अडकतायत लग्नाच्या बेडीत; तिच्या गाली लागली हळद

मुंबई : 'लिटील चॅम्प्स' आता मोठे झालेत.... असंच म्हणावं लागेल. कारण, सध्या याच रिअॅलिटी शोमुळं प्रकाशझोतात आलेले चेहरे, एकमेकांचे खास मित्र, एकत्र स्टेज शो करणारी, एकमेकांना घडताना याचीदेही पाहणारी दोन माणसं लग्नच्या बेडीत अकडणार आहे. 

आम्ही लहानपणापासून एकमेकांना ओळखतो, असं मोठ्या गर्वानं सांगणारी आणि प्रेमात आकंठ बुडालेली ही जोडी म्हणजे गायिका जुईली जोगळेकर आणि गायक रोहित राऊत.  (Rohit Raut Juilee Jogalekar)

गेल्या काही दिवसांपासून जुईली आणि रोहित या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून लग्नाच्या दिवसांचा काऊंटडाऊन सुरु केला होता. 

प्रेमाची कबुली दिली, त्या क्षणापासून ते रिलेशनशिपमध्ये आल्यानंतरच्या पहिल्या स्टेज शो पर्यंतचा प्रवास त्यांनी चाहत्यांच्या भेटीला आणला. 

प्रेमाचं हे नातं त्यांनी कधी कोणापासून लपवून ठेवलं नाही, म्हणूनच की काय, अनेकांसाठीच ही जोडी म्हणजे मैत्री आणि प्रेमाचा मेळ असणारी सुपरहिट जोडी ठरत आहे. 

सध्या यांच्या लग्नासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. जुईलीच्या घरी लग्नाची लगबग सुरु झाली असून, तिला रोहितच्या नावाची हळदही लागली आहे. 

फॅन पेजवरून तिचे गोड फोटो बरेच व्हायरल होत आहेत. जिथं तिच्या चेहऱ्यावरचा आनंद खुप काही सांगून जात आहे. 

फक्त जुईलीच नाही, तर रोहितकडेही जोरदार तयारी सुरु आहे. नुकतंच त्यानं इन्स्टा स्टोरीमध्ये त्याच्या भावाचा एक फोटो पोस्ट केला होता. 

जिथं त्याचा भाऊ लग्नाची तयारी नीट सुरु आहे ना, याची पाहणी करताना दिसला. 

थोडक्यात काय, तर या दोघांचाही लग्नाची 'आली समीप घटिका...' असं म्हणायला हरकत नाही. 

त्यामुळं तुम्हीही अक्षता घेऊन सज्ज रहा, कारण मंगलाष्टकं कधीही कानी पडतील.... आणि जुईली कायमची रोहितची झालेली असेल.   

Read More