Marathi News> मनोरंजन
Advertisement

लग्नाच्या २४ वर्षानंतर सीमा सजदेहने सोहेल खानला दिला घटस्फोट; धक्कादायक कारण समोर

सीमा सजदेह सध्या 'फेब्युलस लाइव्ह ऑफ बॉलीवूड वाइव्हज'मुळे चर्चेत आहे.

लग्नाच्या २४ वर्षानंतर सीमा सजदेहने सोहेल खानला दिला घटस्फोट; धक्कादायक कारण समोर

मुंबई : सीमा सजदेह सध्या 'फेब्युलस लाइव्ह ऑफ बॉलीवूड वाइव्हज'मुळे चर्चेत आहे. नवीन सीझनमध्ये  सीमा सजदेहला खूप कौतुक मिळत आहे. 'फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलीवूड वाइव्हज' या वेब शोसाठी सीमाला चाहत्यांकडूनही भरभरून प्रेम मिळत आहे. शोमध्ये मौजमजा करण्यासोबतच सीमाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही खुलेपणाने सांगितलं.

सीमा सोहेलसोबतच्या नात्याबद्दल म्हणाली असंकाही
शोच्या सुरुवातीला सीमाने घराबाहेरील तिची नेमप्लेट काढली  आणि ती 'खान' वरून बदलून तिच्या मुलांची नावे सीमा निर्वाण योहान अशी ठेवली. सीमा सजदेहने या कृत्यातून इतकं स्पष्ट केलं आहे की, सोहेल खान आणि त्याचे मार्ग आता पूर्णपणे वेगळे झाले आहेत.

सीमाने घटस्फोट का घेतला?
एका एपिसोडमध्ये, संजय कपूरची पत्नी महीप कपूरने सीमा सजदेहला प्रसिद्ध मॅच मेकर आणि नेटफ्लिक्स मालिकेची स्टार 'इंडियन मॅचमेकिंग' सीमा टापरियाची मदत घेण्यास सांगितलं. सीमा टापरिया जेव्हा सीमा सजदेहला भेटली. तेव्हा ती त्याला सोहेल खानसोबतच्या घटस्फोटाबद्दल विचारते. या प्रश्नावर सीमा सजदेहने सांगितलं की, ती आणि सोहेल खान गेल्या ५ वर्षांपासून वेगळे राहत आहेत. दोघांमधील मुद्दा असा होता की, दोघांची विचारसरणी एकमेकांपेक्षा खूप वेगळी होती आणि दोघांमध्ये अनुकूलतेचे मुद्दे होते.

सीमा सजदेह आणि सोहेल खान यांनी 1998 मध्ये लग्न केलं. 2000 मध्ये त्यांचा मुलगा निर्वाणचा जन्म झाला. यानंतर, 2011 मध्ये, या जोडप्याने सरोगसीच्या मदतीने त्यांच्या दुसऱ्या बाळाचं स्वागत केलं.

सीमा आणि सोहेलने लग्नाच्या 24 वर्षानंतर एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघंही आपापल्या आयुष्यात वाटचाल करत आहेत. मात्र, त्यांच्या विभक्त होण्याच्या बातमीने चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

Read More