Marathi News> मनोरंजन
Advertisement

Lock Upp: मुनव्वर फारुकीचं नशीब उजळ, मिळाली स्पर्धकाला 'ही' मोठी ऑफर!

कंगना राणौतचा रिएलिटी शो 'लॉक अप' सतत चर्चेत असतो.

Lock Upp: मुनव्वर फारुकीचं नशीब उजळ, मिळाली स्पर्धकाला 'ही' मोठी ऑफर!

मुंबई : कंगना राणौतचा रिअॅलिटी शो 'लॉक अप' सतत चर्चेत असतो. या शोचा प्रत्येक स्पर्धक इतका लोकप्रिय झाला आहे की, त्यांना आता मोठी ऑफर मिळू लागल्या आहे. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे.  हा स्पर्धक दुसरा कोणी नसून मुनवर फारुकी आहे.

रोहित शेट्टीच्या शोमध्ये मिळाली ऑफर
आमच्या पार्टनर वेबसाईट बॉलीवूड लाईफ मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, 'लॉक अप' स्पर्धक मुनावर फारुकीला रोहित शेट्टीच्या प्रसिद्ध शो 'खतरों के खिलाडी 12' साठी संपर्क साधण्यात आला आहे. मनुवरने अद्याप या शोबद्दल काहीही दुजोरा दिलेला नाही.

'लॉकअप' चा लोकप्रिय स्पर्धक मुनावर 
'लॉकअप' या शोमुळे मुनव्वर फारुकीची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. मुनव्वर शोमध्ये रोज काही ना काही करतो जे चाहत्यांनाही आवडतं. या शोची आणखी एक खेळाडू अंजलीने तर मुनव्वरला आय लव्ह यू म्हटलं आहे. ज्यामुळे मुनव्वर हेडलाईनमध्ये आला होता.

Read More