Priyanka Chopra's Mother Madhu Chopra : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राची क्रेझ आजही कमी झालेली नाही. प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'दोस्ताना' चे दिग्दर्शक तरण मनसुखानी यांच्याविषयी एक खुलासा केला आहे. प्रियांकानं सांगितलं की आधी तरुण कसे होचे आणि जेव्हा प्रियांकाला ताप आला ती शूटवर जाऊ शकली नाही तेव्हा तिला कशा प्रकारे टोमणे मारण्यात आले. पण तेव्हा मधु चोप्रा यांनी तरुण मनसुखानी यांना फोन केला आणि खडेबोल सुनावले. प्रियांकानं 'दोस्ताना' मध्ये काम केलं होतं. पण त्यावेळी तरुण मनसुखानीसोबत काही वाद सुरु होते. त्यामुळे प्रियांका सतत ही काळजी घ्यायची की त्यांच्या कोणत्या कृतीमुळे तरुण मनसुखानी हे नाराज व्हायला नको.
मधु चोप्रा यांनी 'लहरें रेट्रो' शी बोलताना 'दोस्ताना' या चित्रपटाच्या शूटिंगच्यावेळचा एक किस्सा सांगितला आहे. जेव्हा प्रियंकाला ताप आला तेव्हा मधु यांनी याविषयी तरुण मनसुखानीला फोन करत सांगितलं त्यानं सगळ्यांना आश्चर्य झालं. मधु चोप्रानं सांगितलं की 'आज मी ज्या तरुणला ओळखते, तो तसा नव्हता. तो खूप वाईट व्यक्ती होता. एक दिवस प्रियांकाला खूप ताप आला. तिनं एक गोळी मागितली आणि मी दिली. ती हट्ट करत होती की ती कामावर जाणार. पण एक तासानंतरही तिचा ताप कमी झाला नाही. मी तिला म्हटलं की तू आराम करायला हवा आणि कामावर जाऊ नको.'
मधुनं पुढे सांगितलं की तिनं 'मला सांगितलं की तरुणला याविषयी सांग. कारण तिनं स्वत: त्याला याविषयी सांगावं असं तिला वाटत नव्हतं. मी तरुणला फोन करुन सांगितलं की प्रियांकाला आज कामावर येता येणार नाही कारण तिला खूप ताप आहे. हे ऐकूण तरुणनं सांगितलं की किती सोप आहे.'
हेही वाचा : 'मला बंदुकीच्या निशाण्यावर ठेवलं, बेड्या ठोकल्या अन्...', सुनील शेट्टीनं सांगितला 9/11 नंतरचा 'तो' प्रसंग
तरुण यांचं हे बोलणं मधु यांना पटलं नाही आणि त्यांनी तरुण यांना उत्तर दिलं. त्या म्हणाल्या की 'जर तुझी इच्छा असेल की तुझ्या सेटवर तिचा जीव गेला पाहिजे तर मी तिला पाठवते. पण जर तिला काही झालं तर त्यासाठी तू जबाबदार असणार.' आता मधू चोप्रा आणि तरुण मनसुखानी हे चांगले मित्र आहेत. मधू यांनी सांगितलं की आता त्या जेव्हा केव्हा तरुणला भेटतात तेव्हा त्या याच गोष्टीवरून त्याला चिडवतात.