Marathi News> मनोरंजन
Advertisement

'एक दोन तीन' या गाण्याचं नवं व्हर्जन येणार

गाण्याच्या नव्या व्हर्जनमध्ये जॅकलिन फर्नांडिस थिरकतांना दिसणार आहे.

'एक दोन तीन' या गाण्याचं नवं व्हर्जन येणार

मुंबई : धकधक गर्ल माधुरी दिक्षितच्या 'एक दोन तीन' या गाण्याचं नवं व्हर्जन 'बागी 2'या सिनेमात रिक्रिएट करण्यात येणार आहे.गाण्याच्या नव्या व्हर्जनमध्ये जॅकलिन फर्नांडिस थिरकतांना दिसणार आहे.

माधुरी दीक्षितचं गाजलेलं गाणं पुन्हा

'बागी 2'चं दिग्दर्शन अहमद खान करत असून तोचं या गाण्याची कोरिओग्राफी करणार आहे. माधुरीच्या गाण्याने रसिकांना चांगलीच भूरळ घातली होती. आता जॅकलिनचं गाणं रसिकांच्या कितपत पसंतीस उतरतं हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. 

तेजाब चित्रपटातील गाणं

तेजाब चित्रपट १९८८ साली आला होता. यातील 'एक दोन तीन' हे गाणं चांगलंच गाजलं होतं, या सिनेमात माधुरी दीक्षित आणि अनिल कपूरची मुख्य भूमिका होती. माधुरी दीक्षितवर एक दोन तीन हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं.

Read More