Madhuri Dixit-Dr. Nene Networth: बॉलिवूडची 'धक-धक गर्ल' माधुरी दीक्षितला कोणत्याही परिचयाची गरज नाही. लहानमुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण तिचा चाहता आहे. 1999 मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न करून तिने लाखो चाहत्यांची मने मोडली. आता नेहमीच प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे, या गोड कपलमधील कोण अधिक श्रीमंत आहे? चला जाणून घेऊया.
लग्नानंतरचे आयुष्य
1999 मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न झाल्यानंतर माधुरी काही काळासाठी बॉलिवूडपासून दूर गेली आणि अमेरिकेत त्यांच्या सोबत नवे आयुष्य सुरू केले. तिथे तिने पत्नी, आई आणि गृहिणी म्हणून जबाबदाऱ्या निभावल्या. मात्र अभिनयापासून फार काळ दूर राहू न शकल्यामुळे, काही वर्षांत ती पुन्हा रुपेरी पडद्यावर परतली.
आलिशान घर आणि माधुरीची संपत्ती
सध्या माधुरी दीक्षित मुंबईतील समुद्रकिनारी असलेल्या भव्य 5500 चौरस फुटांच्या अपार्टमेंटमध्ये पती श्रीराम नेने आणि मुलं अरिन - रायनसोबत राहते. 90 च्या दशकापासून इंडस्ट्रीवर राज्य करणाऱ्या माधुरीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. शिवाय ती विविध रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणूनही दिसते. माधुरी अनेक ब्रँडची अॅम्बेसेडर आहे आणि तिचे स्वतःचे प्रॉडक्शन हाऊसही आहे. रिपोर्ट्सनुसार, तिची एकूण संपत्ती 250 कोटी आहे. ती एका चित्रपटासाठी 4-5 कोटी, तर रिअॅलिटी शोसाठी 10 कोटी मानधन घेते.
हे ही वाचा: फक्त 6 दिवसांत निर्मात्यांना कोट्यवधीचा नफा देणारा चित्रपट; 2763 कोटी कमावून मोडले सर्व रेकॉर्ड्स
डॉ. श्रीराम नेने यांची संपत्ती
माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने हे मूळचे अमेरिकेतले हृदयरोग तज्ज्ञ. त्यांनी कॅलिफोर्नियात यशस्वी सर्जन म्हणून कारकीर्द गाजवली. नंतर भारतात येऊन त्यांनी पाथफाइंडर हेल्थ सायन्सेस ही डिजिटल हेल्थ कंपनी सुरू केली. श्रीराम नेने यांना लक्झरी कारचा शौक असून त्यांच्या संग्रहात अनेक महागड्या गाड्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती सुमारे 100 कोटी असून, महिन्याला 7 लाखांहून अधिक उत्पन्न ते मिळवतात.
दोघांची एकत्रित संपत्ती
जर माधुरी आणि डॉ. श्रीराम नेने यांच्या एकूण संपत्तीची भर घातली, तर ती जवळपास 350 कोटींपर्यंत जाते. यावरून स्पष्ट होते की माधुरी तिच्या पतींपेक्षा जास्त श्रीमंत आहे. मात्र दोघेही आपापल्या क्षेत्रात उत्तम प्रकारे यशस्वी आहेत.