Marathi News> मनोरंजन
Advertisement

बर्थडे स्पेशल : संजय दत्तशिवाय या अभिनेत्यांशी जोडले गेले माधुरीचे नाव...

बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितचा आज ५१ वा वाढदिवस आहे. 

बर्थडे स्पेशल : संजय दत्तशिवाय या अभिनेत्यांशी जोडले गेले माधुरीचे नाव...

मुंबई : बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितचा आज ५१ वा वाढदिवस आहे. मुंबईत जन्म झालेल्या माधुरीने १९८४ मध्ये आलेल्या अबोध सिनेमातून सिनेसृष्टीतील आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर अनेक अभिनेत्यांसोबत तिने सिनेमांमध्ये काम केले. त्यादरम्यान तिचे नाव अनेक अभिनेत्यांशी जोडले गेले. यापैकी संजय दत्तसोबतचे तिचे अफेअर चर्चेचा विषय ठरले. पण या अफेअर्सबद्दल तुम्हाला माहित आहे का?

संजय दत्त आणि माधुरीचे नाते काही कोणापासून लपलेले नाही. खलनायक सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सुरु झालेले संजय-माधुरीचे अफेअर फार काळ टिकले नाही. मात्र त्याची जोरदार चर्चा होती.

fallbacks

अनिल कपूर आणि माधुरी दीक्षितने अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे. या दोघांची जोडी लोकप्रिय ठरली आणि दोघांनी अनेक हिट सिनेमे दिले. अनेक हिट सिनेमांतून एकत्र आलेली ही जोडी त्यांच्या अफेअरमुळे चर्चेचा विषय ठरली. मात्र त्यावर दोघेही कधी खुलेपणाने बोलले नाहीत.

fallbacks

हम आपके है कौन मध्ये सलमान-माधुरीच्या जोडीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शूटिंगदरम्यान दोघांची जवळीक वाढली आणि या दोघांच्या अफेअर्सच्या चर्चांना उधाण आले.
जॅकी श्रॉफ आणि माधुरीचे नाते अनेकदा चर्चेत राहिले. पण काही कारणास्तव ते नाते फार काळ टिकले नाही.

fallbacks

त्यानंतर मात्र १९९९ मध्ये माधुरी डॉक्टर श्रीराम माधव नेने यांच्याशी विवाहबद्ध झाली. त्यानंतर काही वर्ष तिने सिनेमातून ब्रेक घेतला. आता सध्या ती बकेट लिस्ट हा मराठी सिनेमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

fallbacks

Read More