Marathi News> मनोरंजन
Advertisement

महाभारत फेम 'शकूनी मामा' रुग्णालयात दाखल! प्रकृती चिंताजनक

Mahabharat Fame Shakuni Mama Gets Admitted in Hospital: महाभारत ही मालिका आपल्या सगळ्यांच्याच आवडीची आहे. परंतु सध्या या मालिकेतील एक जेष्ठ कलाकाराबद्दल एक मोठी अपडेट येते आहे. ज्येष्ठ अभिनेते गूफी पेंटल यांना रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. 

महाभारत फेम 'शकूनी मामा' रुग्णालयात दाखल! प्रकृती चिंताजनक

Mahabharat Fame Shakuni Mama Gets Admitted in Hospital: महाभारत या मालिकेतील शकुनी मामाची भुमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते गूफी पेंटल यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांची तब्येत सिरियस असल्याचे सांगितले जात आहे. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना रूग्णालयात तातडीनं भरती करण्यात आल्याचे समजते आहे. अभिनेत्री टीना घई यांनी यावेळी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. 

महाभारत ही मालिका आपल्या सगळ्यांचीच आवडती आहे. त्या काळात या मालिकेनं प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरली होती. त्यामुळे या मालिकेनं तेव्हा इतिहास रचला होता. रामायण आणि महाभारत या मालिका पाहण्यासाठी अक्षरक्ष: रस्ते ओस पडायचे. या मालिकेतील सर्वात लोकप्रिय भुमिका म्हणजे शकूनी मामाची जी गूफी पेंटल यांनी केली होती. अभिनेत्री टीना घई यांनी इन्टाग्राम अकांऊटवरून याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलंय की, ''गूफी पेंटल हे खूप आजारी आहेत. त्यांच्यासाठी पार्थना करावी. ते लवकरात लवकर बरे होतील यासाठी प्रार्थना करते आहे.''

हेही वाचा - 'या' बॉलिवूड सेलिब्रिटी मद्याच्या आहारी न जाता स्वत:ला ठेवतायेत निरोगी

गेल्या काही दिवसांपासून गूफी पेंटल यांच्यावर उपचार सूरू आहेत. त्यांची तब्येत खालावली होती. आता त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे कळते आहे. त्यांना 31 मे रोजी रूग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांची तेव्हा तब्येत अचानक बिघडली होती. आता त्यांच्यावर एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे कळते आहे. तेव्हा सगळेच त्यांच्या तब्येतीची विचारपूस करताना दिसत आहेत. या पोस्टखालीही अनेक चाहत्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारणा केली असून त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

महाभारत ही कथा सर्वांच्याच आवडीची आहे. तेव्हा या मालिकेनं टीआरपीची सर्वात मोठा आकाडा गाठला होता. त्यामुळे या मालिकेची तेव्हा प्रचंड चर्चा रंगली होती. या मालिकेतील प्रत्येक कॅरेटक्टर हे लोकांच्या मनात घर करून होते. गूफी पेंटल हे अभिनेता होण्यापुर्वी भारतीय सैन्य दलातही होते. त्यांनी यापुर्वी अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांतून कामं केली आहे. 1980 च्या दशकात त्यांनी आपल्या अभिनयाची जोरदार सुरूवात केली होती. त्यांच्या महाभारतातील भुमिकेची आजही अनेकांना आठवण होते. आता त्यांची तब्येत बिघडल्यानं त्यांच्या चाहत्यांमध्ये काळजीचा सूर आहे. ते लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून त्यांचे चाहते त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. 

Read More