Marathi News> मनोरंजन
Advertisement

महाराष्ट्राची हास्यजत्रामधील 'या' अभिनेत्रीचा 'तो' Video आला समोर... प्रेक्षक हैराण

शिवाली पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटातील ‘काय उमगेना’ हे रोमॅंटिक गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. 

महाराष्ट्राची हास्यजत्रामधील 'या' अभिनेत्रीचा 'तो' Video आला समोर... प्रेक्षक हैराण

Maharashtrachi Hasya Jatra : महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षामपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. शो सध्या संपुर्ण महाराष्ट्राला खळखळवून हसवत आहे. या शोमधील कलाकारांच्या उत्कृष्ट कॉमेडीमुळे शोचा प्रेक्षक वर्ग प्रचंड वाढला आहे. या शो मधील कलाकारांच्या दमदार कॉमेडीने लाखो त्यांचे चाहते झाले आहेत. अशीच एक अभिनेत्री शिवाली परब ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचली. शिवालीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अफलातून अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत ती प्रेक्षकांचं मनोरंजन करते. शिवाली ‘प्रेम प्रथा धुमशान’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (Maharashtrachi Hasya Jatra marathi actress shivali parab physical relationship video viral audience was shocked nz)

हे ही वाचा - धक्कादायक! या बॉलिवूड अभिनेत्रींनी त्यांच्यापेक्षा लहान अभिनेत्यांसोबत ठेवले होते शारीरिक संबंध... 


शिवाली परब मुख्य भूमिकेत 

शिवाली परब मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटातून गावातील थरारक प्रेमकथेवर आधारित आहे. चित्रपटात शिवाली मालवणी भाषा बोलताना दिसत आहे. चित्रपटात अगदी साध्या दिसणाऱ्या शिवालीचा गाण्यातील बोल्डनेस पाहून प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले आहेत. येत्या ४ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

 

हे ही वाचा - बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टार्सचे वीज बिल ऐकून तुम्हाला ही बसेल आश्चर्याचा धक्का...


शिवाली पडद्यावर रोमान्स करताना दिसणार

‘प्रेम प्रथा धुमशान’ चित्रपटात प्रेक्षकांना शिवालीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळणार आहे. शिवाली पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटातील ‘काय उमगेना’ हे रोमॅंटिक गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यात शिवालीने लिपलॉकिंग सीन दिले आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून प्रेक्षकांना हसवणाऱ्या शिवालीचा बोल्ड अंदाज पाहून चाहतेही अवाक आहेत.

 


चित्रपटातील कालाकार मंडंळी

अभिजीत वारंग दिग्दर्शित ‘प्रेम प्रथा धुमशान’ चित्रपटात शिवालीसह विनायक चव्हाण, अभय खडपकर, अभय नेवगी, मिलिंद गुरव, विश्वजित पालव, विद्याधर कार्लेकर, निकिता सावंत, कल्पना बांदेकर हे कलाकारही झळकणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती ऑक्सिजन फिल्म्स, डायनॅमिक पिक्चर्स, आरव्हीके फिल्म्स यांनी केली आहे.

हे ही वाचा - Optical Illusion : 'या' फोटोतली मांजर  शोधून दाखवा, तुमच्याजवळ फक्त 15 सेकंद


तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शो मधील अभिनेत्री शिवाली परब ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करुन चाहत्यांचे मनोरंजन करत असते. ती सध्या अनेक नवीन प्रोजक्टसवर काम करताना दिसत आहे. तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे की लवकरच तिला अनेक नवीन प्रोजेक्टसमध्ये पाहायला मिळेल.

Read More