Marathi News> मनोरंजन
Advertisement

'ते' वक्तव्य महेश बाबूला पडलं महागात..ट्रोलिंगनंतर घ्यावा लागला 'हा' निर्णय

 महेश बाबूने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या विधानावरून आता माघार घेतली आहे. लोकांनी महेश बाबूला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं होतं.

'ते' वक्तव्य महेश बाबूला पडलं महागात..ट्रोलिंगनंतर घ्यावा लागला 'हा' निर्णय

मुंबईः साऊथ सुपरस्टार महेश बाबूच्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. महेश बाबूने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या विधानावरून आता माघार घेतली आहे. लोकांनी महेश बाबूला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं होतं. आता त्या विधानावरून महेश बाबूनं स्पष्टीकरण दिलं आहे.

fallbacks
 
महेश बाबूला बॉलीवूड पदार्पणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यानं बॉलीवूडचा खरपूस समाचार घेत बॉलीवूडला मी परवडत नाही, असे म्हणणं महागात पडले आहे. आता महेश बाबूनं यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 

महेश बाबूच्या पीआर टीमने अभिनेत्याचे वक्तव्य जारी केले आहे. स्पष्टीकरण देताना महेश बाबू म्हणतोय की, त्याला सर्व सिनेमा आवडतात आणि सर्व भाषांचा आदर करतो.  मी जिथे चित्रपट करतो म्हणजे दाक्षिणात्य सिनेमात मला कम्फर्टेबल वाटतं.

fallbacks

तेलुगू चित्रपट मोठी झेप घेत आहे, त्यामुळे माझं स्वप्न साकार होत आहे याचा मला आनंद आहे. मला इथे (दक्षिण) मिळालेले स्टारडम आणि प्रतिष्ठा खूप मोठी आहे. त्यामुळेच मी माझी इंडस्ट्री सोडून इतर कोणत्याही इंडस्ट्रीचा भाग बनण्याचा विचार करत नाही. मी नेहमीच चित्रपट करण्याचा आणि मोठा होण्याचा विचार करतो. 

महेश बाबूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, त्यांचा शेवटचा रिलीज झालेला सरिलेरू नीकेव्वरू हा होता जो 2020 मध्ये आला होता आणि आता त्याचा आगामी सिनेमा Sarkaru Vaari Petla जो 12 मे रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे

Read More