Marathi News> मनोरंजन
Advertisement

'आई म्हणायची की तू नागर ब्राह्मण आहेस, भीती वाटली तर अली मदत म्हणत जा'; महेश भट्ट यांनी सांगितला आईचा 'तो' किस्सा

Mahesh Bhatt : महेश भट्ट यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांची मुस्लीम आई  त्यांना लहाणपणी काय सल्ला द्यायची याचा खुलासा केला आहे. 

'आई म्हणायची की तू नागर ब्राह्मण आहेस, भीती वाटली तर अली मदत म्हणत जा'; महेश भट्ट यांनी सांगितला आईचा 'तो' किस्सा

Mahesh Bhatt : बॉलिवूडचे दिग्दर्शक महेश भट्ट हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या त्यांचं चर्चेत येण्याचं कारण त्यांची एक मुलाखत आहे. महेश भट्ट यांचे वडील हे हिंदू होते आणि आई मुस्लीम. तर जख्म या चित्रपटाची पटकथा ही त्यांच्या आयुष्यावर आधारीत असल्याचं म्हटलं आहे. एका मुलाखती दरम्यान, महेश भट्ट यांनी त्यांच्या बालपणीविषयी आणि आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितलं की त्यांच्या आयुष्यात खूप विरोधाभास होता. बालपणी जे झालं त्याच्या त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला. हेच कारण होतं की चित्रपटांमध्ये कुठे ना कुठे त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी पाहायला मिळतात. 

महेश भट्ट यांनी नुकतीच 'बीबीसी'ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत जेव्हा महेश भट्ट यांना त्यांच्या बालपणाविषयी विचारलं तर तेव्हा ते म्हणाले, "1948 मध्ये स्वातंत्र्य भारतात माझा जन्म झाला. माझी आई ही शिया मुस्लीम होती. वडील हे ब्राह्मण भट्ट फिल्ममेकर होते. मुंबईच्या एका फेमस पार्क शिवाजी पार्कच्या जवळ आम्ही राहायचो. तिथेच आमचा जन्म झाला आणि लहाण असताना शाळेत जाण्या आधी अंघोळ घालायची तेव्हा सांगायची की तू एका ब्राह्मणाचा मुलगा आहेस. तुझं गोत्र भार्गव आहे, अश्विन शाखा आहे. पण तुला भिती वाटली की या अली मदत असं बोलत जा. तर आम्ही डॉन बॉस्कोमध्ये शिकलो. आम्ही तेव्हाच्या हिंदुस्थानाचे आदर्श होतो. आम्ही कधी विचारही केला नव्हता की एक काळ असाही येईल. आमच्या नसा-नसात वसलेली विविधतेवर आधारित सच्ची संस्कृती आम्हाला एक जखम म्हणून घेऊन फिरावी लागेल."

महेश भट्ट पुढे म्हणाले की "पण आजही मी अभिमानाने म्हणतो की ही बहुसांस्कृतिकता ही आपली ओळख आहे. जर मी कोणत्याही एका भागातून वगळला गेलो तर मी अर्धवट राहीन. बालपणी आपल्या जे काही शिकवलं ते आपल्यासोबत राहतं. माझे बालपण खूप सुंदर होते. एक प्रकारची अस्वस्थता होती. आम्ही सत्य एखाद्या जखमेसारखे लपवायचो. समाजाच्या दृष्टीने आमच्या वडिलांनी आमच्या आईशी लग्न केलं नाही. ते एका कलंकासारखे होते जे संपूर्ण कुटुंबाने लपवण्याचा प्रयत्न केला. हे काय आहे ते मला कळायचं नाही. एकीकडे शिकवलं जात होतं की खरं बोलायचं. आम्ही उघडपणे या गोष्टीचा उल्लेख करायचो तर घरचे चिडायचे की घरातल्या गोष्टी बाहेरच्या लोकांशी करायच्या नाही."

हेही वाचा : PhD चं शिक्षण सोडून एडल्ट कंटेंट बनवू लागली 24 वर्षांची तरुणी; कमाई ऐकून व्हाल थक्क

पुढे महेश भट्ट म्हणाले की "मी बाहेरच्यांना वेगळं समजत नव्हतो. या सगळ्या गोष्टी सावली सारखे माझा पाठलाग करतात. अभ्यासात मी इतका चांगला नव्हतो. गणित शिकवायचे तर कळायचं नाही की हे नेमकं काय आहे. मी रस्त्यावर बाहेर पळायचो. रस्त्यावर लोकं कसे राहतात किंवा वागतात आणि त्याशिवाय फेरिवाल्यांचं आयुष्य पाहायला खूप आवडायचं. शाळेत जे शिकवलं जातं होतं ते खऱ्या आयुष्यात नव्हतं फक्त पुस्तकं होतं. मुलांना सुद्धा विरोधाभास दिसून येतो. त्याविषयी सांगताना ते म्हणाले की त्यामुळे ते खरं काय आहे हे दाखवू लागले. तर महेश भट्ट यांचा 'जख्म' हा चित्रपट त्यांची आई शिरीन मोहम्मद अली यांच्या खऱ्या आयुष्यातून प्रेरित आहे."

Read More