Marathi News> मनोरंजन
Advertisement

'तो जसा आहे तसा मला आवडतो, पण...' महेश मांजेरकरांनी मुलगा सत्याबद्दल का केलं असं विधान? कोणत्या आजाराने त्रस्त?

Mahesh Manjrekar Talk About Son Satya Disease : अभिनेते दिग्दर्शक सत्या मांजरेकर यांनी पहिल्यांदाच मुलगा सत्या मांजरेकर याच्या आजारपणाबद्दल सांगितलं आहे. 

'तो जसा आहे तसा मला आवडतो, पण...' महेश मांजेरकरांनी मुलगा सत्याबद्दल का केलं असं विधान? कोणत्या आजाराने त्रस्त?

मराठी तसंच बॉलिवूडमधील मोठं नाव म्हणजे महेश मांजरेकर. दिग्दर्शक आणि अभिनेता असलेले महेश मांजरेकर हे पहिल्यांदाच आपला मुलगा सत्या मांजरेकरबद्दल बोलल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगल व्हायरल होत आहे. आपल्या सगळ्यांना माहितच आहे की, सत्या मांजरेकर हा हॉटेल व्यवसायात उतरला आहे. 'सुका-सुकी' हे हॉटेल सुरु केलं आहे. या हॉटेलची चर्चा सोशल मीडियावर असतेच. 

महेश मांजरेकर काय म्हणाले सत्याबद्दल?

सत्या खुप चांगला मुलगा आहे. पण कधी कधी वाटतं की तो आताच्या समाजात शोभून दिसत नाही. तो खूपच साधा आहे, त्याला कोणाबद्दल वाईट विचार येत नाही, त्यामुळे काही झालं की तो लगेच इमोशनल होतो. त्याला अटेंशन-डेफिसिट/हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर (ADHD) हा मानसिक आजार आहे.तो चिडला की खूप चिडतो पण ठरवून कुणाला दुखावणार नाही. तो जसा आहे तसा मला तो आवडतो. त्याला अभिनय क्षेत्रात काम करायचं होतं. त्याने कामही केलं, पण तो जर चांगला ऍक्टर असता तर मी त्याला पुढे करूही दिलं असतं. पण मीच त्याला समजावलं आणि हॉटेल व्यवसायात लक्ष घालण्यासाठी सांगितलं. त्याने ते ऐकलं, मी कायमच त्याच्यासाठी असेन!"- अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी पहिल्यांदाच त्यांच्या मुलाबद्दल हा खुलासा केला आहे.

अजून काय म्हणाले महेश मांजरेकर, जर माझा मुलगा माझ्याकडे येऊन म्हणाला की तो समलैंगिक संबंधात आहे तर मी त्याचा नक्कीच विकार करेन. कारण तो त्याचा निर्णय आहे आणि त्याचा आयुष्य आहे. त्याला त्याच्या पद्धतीने जगू दिला पाहिजे. अगदी माझ्या मुलीने सुद्धा असं मला सांगितलं तरी तिलाही मी परवानगी देईन. आधीच्या काळात पालक मुलांचं हे सत्य पचवू शकत नव्हते. त्यामुळे आत्महत्येच्या अनेक घटना घडतात. 

ADHD ची मुख्य लक्षणे आणि परिणाम:

अटेंशन डेफिसिट हायपरअ‍ॅक्टिव्हिटी डिसऑर्डर (ADHD) हा एक न्यूरोडेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे जो मुले आणि प्रौढ दोघांनाही प्रभावित करतो आणि त्यात प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात अडचण (अवशेषता), जास्त क्रियाकलाप (अतिक्रियाशीलता) आणि विचार न करता कृती करण्याची प्रवृत्ती (आवेग) यांचा समावेश आहे. या स्थितीमुळे एखाद्या व्यक्तीला शाळेत, घरी आणि सामाजिक परिस्थितीत समस्या येऊ शकतात, जरी त्याची कारणे अद्याप पूर्णपणे ज्ञात नाहीत, परंतु अनुवांशिक आणि पर्यावरणीय घटक भूमिका बजावू शकतात.

लक्षणे काय?

लक्ष केंद्रित करण्यात अडचण, सहज विचलित होणे, कामे पूर्ण करण्यात अडचण येणे आणि गोष्टी विसरणे. अस्वस्थ वाटणे, शांत बसणे कठीण होणे आणि सतत धावणे किंवा गोष्टींना स्पर्श करणे. विचार न करता प्रतिक्रिया देणे किंवा परिणामांचा विचार न करता गोष्टी करणे.

ADHD बद्दल महत्त्वाच्या गोष्टी:

ADHD बहुतेकदा बालपणात सुरू होते आणि प्रौढत्वापर्यंत टिकू शकते.

डॉक्टरांना ADHD ची नेमकी कारणे माहित नसली तरी, ते बहुतेकदा कुटुंबांमध्ये चालते आणि काही गैर-अनुवांशिक घटक देखील त्यात सामील असू शकतात.

योग्य उपचारांसह (जसे की औषधे, थेरपी आणि वर्तणुकीशी संबंधित आधार), एडीएचडी असलेले लोक त्यांच्या जीवनाच्या सर्व क्षेत्रात चांगले काम करू शकतात.

Read More