Marathi News> मनोरंजन
Advertisement

कान्समध्ये रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंडनं वेधलं अनेकांच लक्ष

रेड कार्पेटवर माहिरा काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये सुंदरच दिसत होती. 

कान्समध्ये रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंडनं वेधलं अनेकांच लक्ष

मुंबई : काही दिवसांपूर्वी भारतीय अभिनेता रणबीर कपूर आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान यांच्या अफेअरच्या चर्चा जोरावर होत्या... मीडियात ही गोष्ट आल्यानंतर दोघांनीही अर्थातच या वृत्ताला नकार दिला... पण, आता मात्र माहिरा दुसऱ्याच गोष्टीसाठी चर्चेत आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानदेखील दाखल झाली होती. लॉरियाल पेरिस पाकिस्तानचं माहिरा प्रतिनिधित्व करतेय... या निमित्तानं माहिरा पहिल्यांदाच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालीय.

रेड कार्पेटवर माहिरा काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये सुंदरच दिसत होती. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या माहिरानं आपले काही फोटो शेअर केलेत. माहिरा पहिल्यांदाच कान्समध्ये सहभागी झाल्यानंतर खूपच आनंदी दिसली.

Read More