Marathi News> मनोरंजन
Advertisement

Malaika Arora ची अपघातानंतर पहिली प्रतिक्रिया

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मलायका अरोराचा अपघात झाला. पण आता अभिनेत्रीची प्रकृती स्थिर आहे...  

Malaika Arora ची अपघातानंतर पहिली प्रतिक्रिया

मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मलायका अरोराचा अपघात झाला. या अपघातात अभिनेत्री जखमी देखील झाली. मलायकाच्या अपघाताची बातमी कळताचं अभिनेता अर्जुन कपूर तिच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी मलायकाच्या घरी पोहोचला. अपघातानंतर मलायकाने पहिल्यांदा सोशल मीडियाच्या माध्यमातू घडला प्रकार सांगितला. ती घटना म होती, अशी प्रतिक्रिया मलायकाने दिली आहे.

मलायका म्हणते, 'गेल्या काही दिवसांत ज्या गोष्टी घडल्या त्या माझ्यासाठी अविश्वसनीय होत्या. जेव्हा मी त्या घटनेचा विचार करते, तेव्हा मला ती घटना एखाद्या सिनेमातील सीनप्रमाणे वाटेत. दुर्घटनेनंतर माझ्या जवळच्या व्यक्तींनी माझी काळजी घेतली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ती पुढे म्हणते, 'ज्या लोकांनी मला रुग्णालयात पोहोचवण्यास मदत केली, माझे कुटुंब कठीण काळात माझ्या पाठीशी उभे राहिले, माझ्यावर उपचार करणारे डॉक्टर. या सर्व लोकांची  ऋणी आहे.'

जेव्हा मलायकाच्या अपघाताची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली, तेव्हा तिच्या अनेक चाहत्यांनी अभिनेत्रीसाठी चिंता व्यक्त केली. म्हणून पोस्टमध्ये मलायका चाहत्यांचे आभार मानायला विसरली नाही...

Read More