Marathi News> मनोरंजन
Advertisement

अरबाजसोबत घटस्फोटानंतर मलाइका आता या अभिनेत्याच्या प्रेमात?

मलाइकाचं या अभिनेत्यासोबत अफेअर?

अरबाजसोबत घटस्फोटानंतर मलाइका आता या अभिनेत्याच्या प्रेमात?

नवी दिल्ली : सलमान खानचा भाऊ अरबाज खान याच्यापासून वेगळी झाल्यानंतर मलाइका अरोडा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मलाइका अरोडा पुन्हा एकदा एका बॉलिवूड अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. लॅक्मे फॅशन वीकमध्ये मलाइका अर्जुन कपूर सोबत दिसली. दोघांच्या अफेयरच्या सध्या चर्चा आहेत. लवकरच ते जगासमोर आपलं नातं जाहीर करतील असं देखील बोललं जात आहे.

'मलाइका आता अर्जुन सोबतचं नातं सगळ्यांसमोर स्विकारणाच्या तयारीत आहे. जेव्हा मलाइका अरबाज सोबत होती तेव्हा सलमान खानने यावर आक्षेप नोंदवला होता. पण आता ती अरबाजपासून वेगळी झालेली आहे. अरबाजच्या आयुष्यात पण आता कोणीतरी आलं आहे अशी चर्चा आहे.

fallbacks

मलाइका आणि अरबाज यांचा घटस्फोट 2017 मध्ये झाला होता. मलाइकाचे अर्जुन सोबत असलेले संबंध या घटस्फोटाचं कारण होतं. मलाईकाने काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, 'अर्जुन हा माझा खूप चांगला मित्र आहे. पण लोकं आमच्या नात्य़ाला चुकीचं नाव देतात हे खूप वाईट आहे.'

fallbacks

Read More