Marathi News> मनोरंजन
Advertisement

मलायकाच्या गळ्यात सलमानची ही खास गोष्ट...; पाहणाऱ्यांना विश्वासच बसेना 

बॉलिवूडची चार्मिंग अभिनेत्री मलायका अरोराची स्टाईल खूपच एट्रॅक्टिव्ह आहे.

मलायकाच्या गळ्यात सलमानची ही खास गोष्ट...; पाहणाऱ्यांना विश्वासच बसेना 

मुंबई : बॉलिवूडची चार्मिंग अभिनेत्री मलायका अरोराची स्टाईल खूपच एट्रॅक्टिव्ह आहे. मलायका ज्या कार्यक्रमात पोहचते ती तिथली संपूर्ण लाइमलाइट लुटते. रविवारी मलायका अरोरा मिस इंडिया 2022 कार्यक्रमात सहभागी झाली होती. या इव्हेंटमधून मलायकाच्या लूकची आणि सिझलिंग स्टाइलची सर्वत्र चर्चा होत आहे. सोशल मीडियावर मलायकाच्या फोटो आणि व्हिडिओंचा बोलबाला आहे. पण यामागे एक खास कारण आहे. 

मलायकाच्या नेकलेसची का होतेय चर्चा?
आम्हाला माहित आहे की मलायकाच्या या लूकची इतकी चर्चा का होतेय या बद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. तसं, मलायका तिच्या ग्लॅमरस आणि सिझलिंग स्टाईलने नेहमीच चर्चेत असते. पण मिस इंडिया स्पर्धेत मलायकाचा नेकलेस पाहून लोकांना सलमान खानचं ब्रेसलेट आठवलं. जे तो नेहमी परिधान करतो.

नेकलेससाठी यूजर्सने मलायकाला ट्रोल केलं
मलायकाचा नेकलेस पाहून अनेक यूजर्स तिला विचारत आहेत की, तिने सलमान खानचं ब्रेसलेट गळ्यात का घातलं आहे? तर दुसर्‍या यूजरने लिहिलं आहे की, सलमान खानचं ब्रेसलेट अभिनेत्रीच्या गळ्यात काय करत आहे? चुकून घरून आणलं आहे का?

मलायकाच्या ब्रेसलेटची चर्चा जोरदार होत आहे. आता आपण अभिनेत्रीच्या ड्रेस आणि लूकबद्दल बोलूया. मलायका मिस इंडिया 2022 स्पर्धेत गोल्डन कलरचा ट्रान्सपरंट ड्रेस घालून पोहोचली होती. मलायकाचा ड्रेस पूर्णपणे सी-थ्रू आहे. मलायकाच्या ड्रेसमधून तिचा अंडरगारमेंट स्पष्टपणे दिसत आहे. पण तिच्या ड्रेसमधून अंडरगारमेंटचा रंग देखील स्पष्ट दिसतोय. अनेक लोकं मलायकाला तिच्या अंडरगारमेंट्समुळेही ट्रोल करत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मिस इंडिया इव्हेंटमध्ये मलायकाने तिच्या गोल्डन ड्रेसला मॅच तिचा मेकअप अगदी साधा ठेवला होता. स्टायलिश हेअरस्टाईल तिच्या लूकमध्ये आकर्षण वाढवत आहे. मलायकाच्या या लूकबरोबरच तिच्या नेकलेसची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरुये.

Read More