Marathi News> मनोरंजन
Advertisement

मलायकाने पुन्हा एकदा कपड्यांमुळे ट्रोल

मलायका अरोराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल

मलायकाने पुन्हा एकदा कपड्यांमुळे ट्रोल

मुंबई : मलायका अरोरा सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. कधी तिच्या फिटनेसमुळे तर कधी तिच्या आणि अर्जुनच्या नात्यामुळे. मलायका अरोराचा फिट राहण्याचा अंदाज हा कायमच चर्चेचा विषय असतो. अनेकदा ती जीममध्ये जाताना स्पॉट होते. तिचे जीममधील कपडे हे देखील चर्चेचा विषय असतात. यामुळे आता ती सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. मलायका अरोराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

ज्यात ती जिम आउटफिट्समध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मलायका जीममध्ये जाताना दिसत आहे. मात्र तिच्या जीम आउटफिट्सचा कलर तिच्या स्किन कलरशी एवढा मिळता जुळता आहे की त्यामुळे सर्वच संभ्रमात आहे. याच लुकवरुन मलायकाला सध्या जोरदार ट्रोल केलं जात आहे.

मलायकाच्या या व्हिडिओची सोशल मीडियावर चांगली चर्चा होत आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. काहींना हा जिम आऊटफीट आवडला आहे तर काहींनी या आऊटफीटसाठी नाक मुरडली आहेत. असा विचित्र जीम आऊटफिट याअगोदर कधीच न पाहिल्याचं देखील सांगण्यात येतंय. 

Read More