Marathi News> मनोरंजन
Advertisement

जिममध्ये जाण्यासाठी निघालेली मलायका अरोरासोबत रस्त्यात नेमकं काय घडलं ज्यामुळे ती अस्वस्थ झाली?

47 वर्षीय मलायका कायमच स्वत:ला तंदुरुस्त ठेवते

 जिममध्ये जाण्यासाठी निघालेली मलायका अरोरासोबत रस्त्यात नेमकं काय घडलं ज्यामुळे ती अस्वस्थ झाली?

मुंबई : मलायका अरोराला तिच्या फिटनेसचं, वर्काआईटचं प्रचंड वेड आहे आणि स्वत: ला फिट ठेवण्यासाठी ती कधीच जिम चुकवत नाही. पापाराझी तिला तिच्या जिम लूकमध्ये पाहाण्यासाठी नेहमीच तयार असतात. आज मलायका जिमला जाण्यासाठी बाहेर पडली होती पण वाटेतच वाहतुकीने तिला घेरलं आणि वाहनांच्या मधोमध ती ट्राफिकमध्ये अडकली.

fallbacks

याचा परिणाम म्हणून मलायका अरोरा अस्वस्थ झाली आणि तिथून निघण्याचा मार्ग शोधू लागली आणि मोठ्या अडचणीने तिथून बाहेर पडली आणि जिममध्ये पोहोचली. मलायकाच्या जिम लूकबद्दल बोलताना आज ती पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट्स आणि ब्लॅक जॅकेटमध्ये दिसली. तिने आपले केस बांधले होते आणि हातात पाण्याची बॉटल होती.

fallbacks

47 वर्षीय मलायका कायमच स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करते आणि स्वत:ची देखभाल करते. तिच्याकडे पाहिलं तर तिच्या वयाचा अंदाज येत नाही. विशेष म्हणजे मलायका बॉलिवूडमध्ये फारच कमी सक्रिय आहे, असं असूनही, ती दररोज चर्चेत राहते. विशेषत: तिच्या जिम लूकबाबत. असा एकही दिवस नाही की ती जिममध्ये जाण्यासाठी स्पॉट होत नाही.

Read More