Marathi News> मनोरंजन
Advertisement

मलायका म्हणते अरहान वडिलांची 'झेरॉक्स कॉपी'

२००२ साली अरहानचे मलायका-अरबाजच्या आयुष्यात अगमन झाले होते.

मलायका म्हणते अरहान वडिलांची 'झेरॉक्स कॉपी'

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या आणि अभिनेता अर्जुन कपूरच्या नात्यामुळे चांगलीच चर्चेत आला आहे. ती सोशल मीडिया नेहमी तिचे अनेक फोटो शेअर करत असते. परंतू आता तिने स्वत:चे फोटो पोस्ट न करता अभिनेता अरबाज आणि मुलगा अरहानचा फोटो शेअर केला आहे. या दोघांचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करत आहे. 

 

fallbacks

 

अरबाज आणि अरहानच्या बालपणीचा फोटो शेअर करत, कॅप्शनमध्ये 'अरहान तू हुबेहूब तुझ्या वडिलांसारखा दिसत आहेस' असे मलायकाने लिहीले आहे. २००२ साली अरहानचे मलायका-अरबाजच्या आयुष्यात अगमन झाले होते. त्यानंतर २०१६ मध्ये ते दोघे एकमेकांपासून विभक्त झाले. सध्या गेल्या काही महिन्यांपासून अरबाज इटालियन मॉडेल जॉर्जिया अँड्रियानीला डेट करत आहे. 

सध्या अर्जुन कपूर आणि मलायकाच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र वाऱ्यासारख्या पसरत आहेत. त्याचप्रमाणे दोघांनी त्यांच्या नात्याची आधिकृत घोषणा देखील केली आहे. दोघांमध्ये असलेल्या वयाच्या अंतरामुळे त्यांच्या नात्यावर नेटकऱ्यांनी चांगलीच टीकेची झोड उठवली होती.

परंतू दोघांना या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही. एका मुलाखतीत मलायका म्हणाली होती की 'मला सगळ्याचा काडीमात्र फरक पडत नाही, कारण अर्जुन मला फार आवडतो.' ऐवढेच नाही तर मलायकाच्या मुलाला सुद्धा त्यांच्या नात्यावर काही अडचण नाही. 

Read More