Marathi News> मनोरंजन
Advertisement

मलायकाचा ड्रायव्हर पसरवतोय तिच्या खाजगी आयुष्यातील बातम्या

मलायकाचा ड्रायव्हर सर्व गोष्टी पसरवत असल्याचा संशय मलायकाला आला आहे.

मलायकाचा ड्रायव्हर पसरवतोय तिच्या खाजगी आयुष्यातील बातम्या

मुंबई: अभिनेत्री मलायका आरोरा आणि अरबाज खान दोघे  विभक्त झाले आहेत. ते दोघे त्यांचे आयुष्य त्यांच्या मर्जीने जगत आहेत. अरबाज खान सध्या मॉडेल जॉर्जियाला डेट करत आहे तर दुसरीकडे मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या नात्याच्या चर्चा रंगत आहेत. अरबाज आणि मलायका घटस्फोटानंतरही एकमेकांचे  चांगले मित्र आहेत. मलायका नेहमी खान कुटुंबीयांच्या कार्यक्रमात उपस्थित असते. मलायका तिच्या व्यक्तिगत आयुष्यातील गोष्टी चाहत्यांना सांगण्यास इच्छूक नसते. 

एका वृत्तानुसार, मलायकाला ज्ञात झाले की तिच्या आणि अर्जुनच्या नात्याबद्दल व्यक्तिगत गोष्टी कोणीतरी पसरवत आहे. मलायकाचा ड्रायव्हर सर्व गोष्टी पसरवत असल्याचा संशय मलायकाला आला आहे. ड्रायव्हर मुकेश हा भाऊ बबलूला मलायका संबंधित सर्व बातम्या सांगत आहे. सर्व प्रकार मलायकाला माहीत झाल्यानंतर तिने ड्रायव्हरला नोकरीवरून काढून टाकले. 

अरबाज आणि मलायका एकत्र असताना अरबाजने स्वतःसाठी बबलूला आणि मलायकासाठी मुकेशला ड्रायव्हर म्हणून नोकरीवर ठेवले. अरबाज आणि मलायका विभक्त झाल्यानंतरही बबलू - मुकेश हे दोघे ड्रायव्हर म्हणून कार्यरत होते. पण त्रासलेल्या मलायकाने तिच्या ड्रायव्हरला कामावरुन बेदखल केले आहे. 

Read More