Marathi News> मनोरंजन
Advertisement

अरबाजला अडचणीत पाहून मलायका गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये

सट्टेबाजीच्या मोहापायी अरबाज खान आणि मलायका यांच्या काडीमोड 

अरबाजला अडचणीत पाहून मलायका गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये

मुंबई : आयपीएल सट्टेबाजीप्रकरणात ठाणे पोलिसांनी अभिनेता अरबाज खानला ताब्यात घेतल होतं. चौकशी केल्यानंतर त्याला सोडण्यात आलं. त्याच्या सट्टेबाजीच्या मोहापायी अरबाज खान आणि मलायका यांच्या काडीमोड झाल्याचे म्हटले जाते. ते दोघेही आता वेगळे राहतात. पण अरबाजला अटक झाल्याचे तिला समजल्यावर तिने लगेच गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये धाव घेतली. साधारण ५ वर्षांच्या डेटींगनंतर या दोघांनी १९९८ ला लग्न केलं होतं. 

मलायकाला सट्टेबाजांचे फोन 

आपल्या नात्यामध्ये वितुष्ट येण्यात सट्टेबाजी कारणीभूत असल्याचे अरबाजने पोलिसांसमोर मान्य केले. सट्टेबाज वसूली करण्यासाठी मलायकालादेखील फोन करत. यावरू दोघांमध्ये भांडणाला सुरूवात झाली.अरबाज आणि मलायका  मे २०१६ पासून वेगळे राहू लागले.त्यानंतर २०१७ त्यांच्यात घटस्फोट झाला. आमच्यात घटस्फोट होण्यास कोणती तिसरी व्यक्ती कारणीभूत नाही असे यावेळी दोघांनी सांगितले होते. घरातील मंडळींना मलायकाचे लाईफस्टाईल न आवडणं किंवा अरबाजची आर्थिक स्थिती मजबूत नसणं अशी कोणतीच अडचण त्यांच्या समोर नव्हती. पण घटस्फोटानंतरही दोघांना अनेकदा पार्टी, लंचला एकत्र पाहिलं गेलं.

Read More