Marathi News> मनोरंजन
Advertisement

मालदीवमध्ये मलायकाचा 'हॉट' अंदाज, अर्जुनची 'स्विट' कमेंट

मालदीवच्या समुद्रात मलायकाने आग लावली आहे. 

मालदीवमध्ये मलायकाचा 'हॉट' अंदाज, अर्जुनची 'स्विट' कमेंट

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री मलायका अरोराच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहेत. अभिनेता अरबाज खानसह विभक्त झाल्यानंतर तिचे नाव अभिनेता अर्जुन कपूर सोबत जोडण्यात येत आहे. नुकताच अर्जुनचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधत हे प्रेमी युगूल न्यूयॉर्कमध्ये गेले होते. पुन्हा मायदेशी परतल्यानंतर मलायका तिच्या गर्ल्स गँगसोबत मालदीवमध्ये सुट्टांचा आनंद घेत आहे.

fallbacks

 

मलायका सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांचा वर्ग देखील फार मोठा आहे. ती कायम इन्स्टाग्रावर फोटो शेअर करत असते. तिचे मालदीवचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. मालदीवच्या समुद्रात मलायकाने आग लावली आहे. 

तिच्या या घायाळ अदांवर अर्जुन कपूरने सुद्धा प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी या दोघांनी त्यांच्या प्रेमाची अधिकृत घोषणा केली आहे. तर अर्जुन त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. 

अर्जुन लवकरच 'पानीपत' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे. या चित्रपटामध्ये अर्जुन शिवाय संजय दत्त आणि क्रिती सेनन देखील झळकणार आहेत. आशुतोष गोवारीकर द्वारा दिग्दर्शित 'पानीपत' ६ डिसेंबर २०१९मध्ये चित्रपटगृहात दाखल होणार आहे. 

Read More