Marathi News> मनोरंजन
Advertisement

मेजवानी : अर्जुनकरता मलाइका अरोरा बनली शेफ

प्रियकराला आनंदी ठेवण्याचा मार्ग पोटातून जातो 

मेजवानी : अर्जुनकरता मलाइका अरोरा बनली शेफ

मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी अभिनेत्री मलाइका अरोरा (Malaika Arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor). या कपलने नुकतंच गोव्यात नवं वर्षांचं सेलिब्रेशन केलं आहे. या खास क्षणांचे फोटो त्यांनी शेअर देखील केले होते. आता इंस्टाग्रामवर अर्जुन कपूरने एक पोस्ट शेअर केली आहे. 

अर्जुन कपूरने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की,'जेव्हा ती तुमच्यासाठी मेजवानी बनवते.' ही पोस्ट त्याने मलाइकाला टॅग केली आहे. मलाइकाने गोव्यातील अनेक फोटो शेअर केले आहेत. या दोघांनी आपलं नातं सार्वजनिक केलं आहे. मलाइका आणि अर्जुन अनेकदा छोट्या छोट्या गोष्टी करून एकमेकांना आनंद देत असतात. 

fallbacks

नवीन वर्षाप्रमाणेच या दोघांनी दिवाळीचं सेलिब्रेशन देखील एकत्र केलं आहे. तसेच धर्मशाळा या सिनेमाच्या सेटवरही हे दोघं एकत्र दिसले. अर्जुन कपूरच्या अफेअर अगोदर मलाइका अरोरा अभिनेता अरबाज खानची पत्नी होती. या दोघांनी घटस्फोट घेऊन आपापले मार्ग वेगळे केले आहेत. त्यानंतर २०१९ मध्ये मलाइका आणि अर्जुनने आपल्या नात्याची कबुली दिली. 

अर्जुन कपूर 'भूत पोलीस' नावाच्या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत यामी गौतम, जॅकलीन फर्नांडिस आणि सैफ अली खान हे देखील असणार आहेत. 

Read More