Marathi News> मनोरंजन
Advertisement

थुकरटवाडीत आदेश-सुचित्राची 'फुल टू धमाल'

आदेश भावोजींनी धरला 'सैराट'वर ठेका

थुकरटवाडीत आदेश-सुचित्राची 'फुल टू धमाल'

मुंबई : तुफान कॉमेडीमुळे 'चला हवा येऊ द्या' मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आलाय. इथे येणारा पाहुणाही थुकरटवाडकऱ्यांप्रमाणे अवलिया असतो. प्रत्येक जण आपला अभिनय, वकृत्व, विनोदाचा टायमिंग दाखवून देत असतात. यावेळी महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणजेच आदेश बांदेकर आणि पत्नी सुचित्रा बांदेकर यांनी 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर हजेरी लावली. यावेळी सैराटच्या गाण्यावर दोघांनी ठेकाही धरला. सुत्रसंचालक निलेश साबळे यावेळी भावोजींच्या भुमिकेत होता. त्याला श्रेया बुगडे, सागर कारंडे, कुशल बद्रिके यांनी चांगली साथ दिली. 

Read More