Marathi News> मनोरंजन
Advertisement

पहिल्याच चित्रपटात 21 किसिंग सीन; पती, वडिलांनीही सोडलं! आज काय करतेय ही अभिनेत्री?

बॉलिवूडला हॉट आणि बोल्ड सीन्स देणाऱ्या आणि रातोरात स्टार बनलेल्या या अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊया मल्लिका शेरावतचे काही न ऐकलेले किस्से...  

पहिल्याच चित्रपटात 21 किसिंग सीन; पती, वडिलांनीही सोडलं! आज काय करतेय ही अभिनेत्री?

Mallika Sherawat Birthday : बॉलीवूडमधील हॉट आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक मल्लिका शेरावत आज तिचा 47 वा वाढदिवस साजरा करत आहे.तिचा जन्म 24 ऑक्टोबर 1976 रोजी हरियाणाच्या रोहतकयेथील जाट कुटुंबात झाला. आपल्या पहिल्या सिनेमातूनच मल्लिकाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली. प्रेक्षकांसमोर स्वतःची एक वेगळी प्रतिमा या अभिनेत्रीने तयार केली. इमरान हाश्मीसोबत ती मर्डर सिनेमात ती झळकली होती, ज्यामध्ये तिने खूप किसिंग आणि बोल्ड सीन्स दिले होते. त्याचबरोबर आपल्या मुलीने अभिनेत्री व्हावं असे तिच्या वडिलांना वाटत नव्हतं. आणि यासाठीच मल्लिकाने  घर सोडलं आणि बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली.  अशा परिस्थितीत मल्लिका शेरावतचे कधिही न ऐकलेले किस्से समोर आले आहेत.

'अशा प्रकारे तिने माझं कुटुंब आणि पतिला सोडलं'
मल्लिका शेरावतचं खरं नाव रीमा लांबा आहे. अभिनेत्रीचे वडील मुकेश लांबा यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ''मला रीमाला आयएएस बनवायचं होतं, पण तिला अभिनय करायचा होता. तिने अभिनेत्री व्हावे असं मला कधीच वाटत नव्हतं. याच गोष्टीसाठी मी तिच्यावर रागावून मी तिला माझं आडनाव वापरू देण्यास नकार दिला.

जर अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, मल्लिका शेरावतचं बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीच लग्न झालं होतं. मल्लिकाचा विवाह पायलट करण सिंग गिलसोबत झाला होता. पण त्यांचे लग्न एक वर्षही टिकू शकलं नाही, खरतर अभिनेत्रीने तिचं लग्न गुपित ठेवलं होतं आणि बॉलिवूडमधील तिच्या कामामुळे तिच्या नात्यात दुरावा आला आणि दोघांचा घटस्फोट झाला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मल्लिका शेरावतने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तडजोड न केल्यामुळे तिला अनेक चित्रपटातून काढून टाकण्यात आलं होतें. अनेकांनी तिच्यावर विविध आरोप केले होते. माझ्याबद्दल अनेक प्रकारचे विचार मांडले गेले. जर तुम्ही स्क्रीनवर शॉर्ट स्कर्ट परिधान केला आणि किसींग सिन दिला तर तुम्ही एक खराब मुलगी आहात. पुरुषा तुमचा फायदा घेवू ईच्छितात. माझ्यासोबतही हे घडलं आहे. मी हिरोसोबत बोल्ड आणि अश्लिल सीन देण्यास नकार दिल्याने मला एका चित्रपटातून काढून टाकण्यात आलं. मर्डर या चित्रपटानंतर मल्लिका शेरावत एका रात्रीत स्टार बनली होती. या चित्रपटात तिने 21 किसिंग सीन दिले होते. हा चित्रपट प्रचंड गाजला.

Read More