Marathi News> मनोरंजन
Advertisement

पहिलाच चित्रपट 17 किस सीन देणारी अभिनेत्री, इंडस्ट्रीपासून आहे दूर, राहतेय विदेशात

Guess Actress: बोल्ड आणि हॉट लुकने नेहमीच चर्चेत असणाऱ्या या 48 वर्षीय अभिनेत्रीने एकाच चित्रपटात दिले होते 17 किसिंग सीन. आज आहे इंडस्ट्रीपासून दूर.

पहिलाच चित्रपट 17 किस सीन देणारी अभिनेत्री, इंडस्ट्रीपासून आहे दूर,  राहतेय विदेशात

Mallika Sherawat: बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत हे नाव कधी काळी चाहत्यांच्या ओठांवर नेहमीच असायचं. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ख्वाहिश’ या पहिल्या लीड रोलमधील चित्रपटात तिने तब्बल 17 किस सीन दिले होते. ज्यामुळे ती खूप चर्चेत आली होती. मात्र, नंतर मल्लिकाने चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. सध्या ती भारतात राहत नसून मल्लिका आता लॉस एंजेलसमध्ये राहत आहे.

दरम्यान, तरीही मल्लिका शेरावत सोशल मीडियावर आपल्या आयुष्याशी संबंधित अपडेट्स शेअर करत असते. नुकतेच तिने 2018 मधील फ्रेंच रिव्हिएरामधील काही जुने फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज पुन्हा एकदा सोशल मीडियावर मल्लिका चर्चेत आली आहे.

मल्लिकाचा नवीन लूक चर्चेत 

मल्लिकाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती स्ट्रॅपलेस गुलाबी लाइट गाउनमध्ये दिसत आहे. ज्यावर ब्लॅक डिटेलिंग आहे. तिने गळ्यात कोणताही नेकलेस परिधान न करता फक्त स्टेटमेंट इयररिंग्स परिधान केल्याचे दिसत आहे. तिचा हा स्टायलिश लूक आता चाहत्यांना भुरळ घालतोय.

मल्लिका शेरावत जरी सिनेमांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती लुकमुळे अजूनही तितकीच चर्चेत असते. तिचा ग्लॅमरस अंदाज, डिझायनर कपडे आणि आत्मविश्वास  हे सर्व तिला आजही एक ‘स्टाईल आयकॉन’ बनवतात.

बॉलिवूडमध्ये आपल्या बोल्ड अभिनय आणि ग्लॅमरस लुकसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे मल्लिका शेरावत. हरियाणाच्या मंदी गावात जन्मलेली मल्लिका नेहमीच पारंपरिक चौकटींपलीकडे जाऊन काम करणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने आपल्या चित्रपटातील साहसिक भूमिकांमुळे आणि फॅशनेबल स्टाइलमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

एकाच चित्रपटात 17 किस 

मल्लिकाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2002 मध्ये ‘जीना सिर्फ़ मेरे लिये’ या चित्रपटातून केली होती. पण तिला खरी ओळख 2003 मध्ये आलेल्या ‘ख्वाहिश’ या चित्रपटामुळे मिळाली. या चित्रपटातीत तिने 17 किस सीनमुळे दिले होते. ज्यामुळे ती प्रचंड चर्चेत आली होती.

त्यानंतर प्रदर्शित झालेल्या ‘मर्डर’  या इरोटिक थ्रिलर चित्रपटामुळे तिला खऱ्या अर्थाने बॉलिवूडमध्ये मोठं यश मिळालं. इम्रान हाशमीसोबत तिची जोडी लोकांना विशेष भावली आणि मल्लिकाचं नाव घराघरात पोहोचलं.

Read More