मुंबई : इंडस्ट्रीमध्ये असे अनेक किस्से दडलेले आहेत, ज्यामुळे अनेकांना संकटांचा सामना करावा लागला, तर काहींची रिलेशनशिप फसवणूक झाली. सध्या अनेक कलाकार अभिनेत्री कंगना रानौतच्या 'लॉकअप'मध्ये आयुष्यात घडलेल्या गोष्टी मोकळ्यापणाने सांगतात. आता अभिनेत्री मंदाना करीमीने शोमध्ये धक्कादायक खुलासा केला आहे.
मंदानाने शोमध्ये तिच्या प्रेग्नेंसीबद्दल मोठा खुलासा केला आहे. स्वतःचं गुपित सांगत मंदाना म्हणाली, 'मी एका प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत रिलेशनमध्ये होती. तो दिग्दर्शक महिलांच्या हक्कांबद्दल कायम बोलत असतो.'
ती पुढे म्हणाली, 'पण त्याला जेव्हा कळालं मी प्रेग्नेंट आहे, तेव्हा त्याने माझी साथ सोडली...' मंदानाची ही क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Heartbreaking. Wonder who is the douchebag!
— Maya (@Sharanyashettyy) April 10, 2022
Mandana Karimi reveals she had an affair with a well-known bollywood director who speaks about women's rights who planned a pregnancy with her and then backed out,coz of which she went through an abortion!pic.twitter.com/SvBLpk8GLt
व्हिडिओमध्ये, शोची होस्ट कंगना रनौत स्पर्धकांना त्यांचे रहस्य विचारते, त्यानंतर मंदाना म्हणाली, 'पतीपासून विभक्त झाल्यामुळे मी संघर्ष करत होते. त्यावेळी माझं प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत सिक्रेट रिलेशन होतं... '
'तो कायम महिलांच्या हक्कांबद्दल बोलत असतो. त्याने बाळासाठी योजना आखली. पण जेव्हा मी प्रेग्नेंट राहिले, तेव्हा तो मला सोडून गेला. ' दरम्यान, मंदानाने यावेळी कोणत्याही दिग्दर्शकाचे नाव घेतलेले नाही.
तिचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो दिग्दर्शक अनुराग कश्यप असावा... असा अंदाज सोशल मीडियावर युजर्स व्यक्त करत आहेत. कारण एक काळ असा होता, जेव्हा मंदाना आणि अनुरागच्या रिलेशनशिपच्या चर्चा तुफान रंगत होत्या.