Marathi News> मनोरंजन
Advertisement

पतीच्या निधनानंतर या अभिनेत्रींची 'अधुरी प्रेम कहानी'; आयुष्यात मोठा बदल

पतीच्या निधनानंतर या अभिनेत्रींचं आयुष्य पूर्णपणे बदललं; एका अभिनेत्रीच्या पतीने संपवलं जीवन  

पतीच्या निधनानंतर या अभिनेत्रींची 'अधुरी प्रेम कहानी'; आयुष्यात मोठा बदल

मुंबई : 'जिंदगी लम्बी नहीं बड़ी होनी चाहिए...' हा डायलॉग सर्वांना माहिती आहे. हा डायलॉग सर्वांच्या पसंतीचा देखील आहे पण जेव्हा आपल्या आवडीचा व्यक्ती आपल्यासोबत असेल. पण जीवनाच्या प्रवासात अर्ध्यावर साथ सोडली तर उरलेलं आयुष्य जोडीदारासाठी फार कठीण असतं. जेव्हा अशा व्यक्तीची साथ तुटते तेव्हा मजबूत व्यक्ती देखली खचून जातो. बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींनी या संकटाचा सामना केला आहे. कोण आहेत या अभिनेत्री ज्यांना त्यांच्या जोडीदाराची साथ फार दिवसांसाठी मिळाली. 

अभिनेत्री मंदिरा बेदी

fallbacks


अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पतीचं निधान यंदाच्या वर्षीच झालं आहे. पतीच्या निधनानंतर मंदिरा पूर्णपणे कोलमडली. आता ती मुलांसोबत आनंदी राहण्याचा प्रयत्न करत आहे. 

अभिनेत्री नितू कपूर

fallbacks


अभिनेत्री नितू कपूर आणि अभिनेते ऋषी कपूर यांची प्रेम कथा सर्वांना माहिती आहे. जेव्हा ऋषी कपूर यांना कॅन्सरचं निदान झालं तेव्हा त्यांनी ऋषी यांची काळजी घेतली. पण ऋषी यांनी नितू यांची साथ सोडली. 

अभिनेत्री रेखा

fallbacks


1990 साली रेखा यांनी उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केलं.  मुकेश यांना व्यवसायात तोटा झाला. ज्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला. लग्नाच्या जवळपास सहा महिन्यानंतरच रेखा यांनी मुकेश यांच्याकडे घटस्फोटाची कागदपत्र पाठवली होती. अखेरीस मुकेश यांनी फार्महाऊसवरच रेखा यांच्या ओढणीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. 

Read More