Marathi News> मनोरंजन
Advertisement

पतीसोबत 25 वर्षांचा मंदिराचा प्रवास... फोटो शेअर करत म्हणाली...

 राज यांच्या निधनाला आज  14 दिवस पुर्ण झाले आहे.

पतीसोबत  25 वर्षांचा मंदिराचा प्रवास... फोटो शेअर करत म्हणाली...

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मंदिरा बेदी आयुष्यातील कठीण प्रसंगाचा सामना  करत आहे. पती राज कौशलच्या मृत्यनंतर मंदिरा पूर्णपणे कोलमडली आहे. मंदिरा या मोठ्या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. जुन्या आठवणी कधीचं कोणीचं पुसू शकत नाही. 49 वर्षीय  राज कौशल यांचं 30 जून रोजी निधन  झालं. गेल्या 25 वर्षांपासून ते दोघे एकत्र आहेत. राज यांच्या निधनाला आज  14 दिवस पुर्ण झाले आहे. तर दुसरीकडे मंदिराने  त्यांच्या 25 वर्षातील प्रवासाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 

मंदिरा आणि राज गेल्या 25 वर्षांपासून एकत्र आहेत. तर त्यांच्या लग्नाला 23 वर्ष पूर्ण झाली आहे. पतीसोबत 25 वर्षांचा प्रवास आठवत मंदिराने इन्स्टाग्रामवर काही फोटो  शेअर केले आहेत. फोटो शेअर करत तिने कॉप्शनमध्ये, 'एकमेकांना समजून घेण्यासाठी 25 वर्ष... लग्नाचे 23 वर्ष... समोर आलेले संघर्ष... ' असं लिहिलं आहे. मंदिराची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गेल्या काही दिवसांपासून मंदिरा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहे. कधी आईसोबत तर कधी मित्रमंडळींसोबत मंदिरा दिसत आहे. फोटो व्हिडिओमध्ये मंदिरा आनंदी दिसत आहे. पण ती पतीच्या निधनाचं दुःख अद्याप पचवू शकली नाही. सोशल मीडियावर मंदिराच्या हसऱ्या चेहऱ्याच्या पोस्ट असल्या, तरी त्यामागे दु:खाची किनार आहे.

राज यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर राज कौशल यांनी अभिनेता म्हणून आपल्या करिअरला सुरूवात केली.  आपल्या करिअरमध्ये 'प्यार में कभी कभी', 'शादी का लड्डू' आणि 'एंथनी कौन है  या चित्रपटांमध्ये दिग्दर्शन केलं आहे.  सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी दुःख व्यक्त केलं आहे. 

Read More