Marathi News> मनोरंजन
Advertisement

मनीषा कोईराला - नाना पाटेकरांच्या ब्रेकअपसाठी कारणीभूत ठरली 'ही' अभिनेत्री? स्वत: केला खुलासा

Actress Talked About Manisha Koirala Breaking Up With Nana Patekar: मला अक्षय कुमारबद्दल नक्कीच आकर्षण वाटायचं असं या अभिनेत्रीने प्रांजळपणे नमूद केलं आहे.

मनीषा कोईराला - नाना पाटेकरांच्या ब्रेकअपसाठी कारणीभूत ठरली 'ही' अभिनेत्री? स्वत: केला खुलासा

Actress Talked About Manisha Koirala Breaking Up With Nana Patekar: अभिनेता अक्षय कुमार, नाना पाटेकर आणि मिथून चक्रवर्ती यांच्यासारख्या बड्या कलाकारांसोबत आपल्या करिअरदरम्यान नाव जोडलं गेलेल्या अभिनेत्रीनं अक्षय कुमारबरोबर आपले प्रेमसंबंध होते की नाही यावर स्पष्टपणे भाष्य केलेलं नाही. मात्र तिने अगदी संतापलेल्या अवस्थेत मिथुन चक्रवर्ती आणि नाना पाटेकरांसोबत आपले प्रेमसंबंध कधीच नव्हते असं म्हटलं आहे. मिथुन आणि नाना पाटेकरांबद्दल असा विषयांवर बोलणं योग्य नसून दोघेही फार वरिष्ठ कलाकार आहेत. आमच्यादरम्यानच्या नात्याबद्दल अफवा पसरवण्यात आल्या, असं या अभिनेत्रीनं म्हटलं आहे. 

आम्ही दर तिसऱ्या दिवशी भेटायचो तर...

ज्या अभिनेत्रीनं हे भाष्य केलं आहे तिचं नाव आयशा झुलका असं आहे. आयशाने पहिल्यांदाच तिच्या कथित लिंकअप आणि अफेअर्सबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे. विकी लालवाणीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आयशाने अभिनेत्री मनिषा कोईराला नाना पाटेकरांसोबतच्या रिलेशनमधून वेगळी होण्यासाठी तू आणि तुझं नानांबरोबर असणारं नातं कारणीभूत होतं का? या प्रश्नालाही उत्तर दिलं आहे. "तुम्ही त्यावेळेचे पेपर उघडून पाहिले तर माझं नाव सर्वांसोबत जोडलं गेलं होतं. आम्ही फक्त मित्र होतो. आमचं नात हे केवळ आनंद देणारं होतं. तुम्ही सहा किंवा सात चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं असे, तुम्ही एकमेकांना सेटवर दर तिसऱ्या दिवशी भेटत असाल तर त्या वयामध्ये हे सहाजीक आहे. माझ्या मैत्रिणींपेक्षा मित्र अधिक होते. आताही अशीच स्थिती आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाबरोबर माझं नातं हे रोमँटिक असेल. आजच्या काळात लपवण्यासारखं काय आहे? आम्ही आता त्या वयाच्या मर्यादा ओलांडल्यात," असं आयशाने मुलाखतीत म्हटलं.

अक्षय कुमारबद्दल आकर्षण वाटायचं पण...

सध्या लिव्ह-इन-रिलेशनशीप आणि प्रेम विवाह यासारख्या गोष्टी सामान्य आहेत. हल्ली अशा गोष्टींबद्दल बोलणं सामान्य मानलं जातं, असंही आयशा म्हणाली. मात्र आयशाने अक्षय कुमारबरोबर अफेअर होतं की नाही याबद्दल स्पष्टपणे उत्तर दिलेलं नाही. तिने हे मात्र मान्य केलं की तिला अक्षय कुमारबद्दल नक्कीच आकर्षण वाटायचं. "ते कदाचित आकर्षण असावं. मात्र ती सामान्य बाब होती. ते काय होतं स्पष्टपणे सांगता येणार नाही. तुम्ही ते केवळ शारीरिक आकर्षण होतं असं म्हणत असाल तर अशा शब्दांमध्ये त्या भावनेबद्दल बोलणं योग्य नाही असं मला वाटतं. शारीरिक आकर्षण ही संज्ञा येथे वापरणं मला योग्य वाटत नाही. आम्हाला कायमच एकमेकांबद्दल आकर्षण वाटायचं मात्र ते शारीरिक आकर्षण नव्हतं हे नक्की," असंही आयशाने स्पष्ट केलं आहे. 

नक्की वाचा >> 'तसला' सीन शूट करताना त्याने..., अभिनेत्रीनं सांगितला धक्कादायक अनुभव; म्हणाली, 'पुरुष म्हणून...'

मनिषा तुझ्यामुळे नाना पाटेकरांना सोडून गेली का? यावर ती म्हणाली...

आपण भूतकाळात रमत राहत नाही. मी मुव्ह ऑन झाली आहे, असंही आयशा म्हणाली. मात्र आयुष्यात कोणत्याही कालावधीमध्ये आपलं मिथुन चक्रवर्ती किंवा नाना पाटेकरांबरोबर प्रेमसंबंध नव्हते असंही आयशाने स्पष्ट केलं आहे. "हे बकवास आहे," असं तिने या दोघांशी असलेल्या कथित अफेअरबद्दल विचारलं असता म्हटलं. तुझ्यामुळे मनिषा कोईरालाने नाना पाटेकरांना सोडलं का? असा प्रश्न विचारला असता आयशाने लगेच, "त्याचा प्रेमसंबंधाशी काडीमात्र संबंध नव्हता. आम्ही एकत्र फोटोशूट केलं होतं. त्यानंतर मी त्यांच्यासोबत एका नाटकातही काम केलं होतं. मात्र ते किती वरिष्ठ होते याचाही इथे विचार केला गेला पाहिजे. माझं नाव माझ्या वयाच्या अभिनेत्यांसोबत जोडलं जाणं मी समजू शकते. मात्र मला वयस्कर लोकांबद्दल बोलायला आवडत नाही. माझं (मनिषा नाना पाटेकरांना सोडून जाण्याशी) काहीही देणं घेणं नव्हतं," असं आयशा म्हणाली.

नक्की वाचा >> 'हनिमून संपेपर्यंत अजय थकून गेला, त्याला सतत...', काजोलचा खुलासा; म्हणाली, 'मी लग्नाआधीच..'

मिथुन चक्रवर्तींसंदर्भात काय म्हणाला?

मिथुन चक्रवर्ती आणि माझ्या प्रेमसंबंधांच्या चर्चा या अफवाच होता असं आयशाने स्पष्ट केलं. "अशा पद्धतीने एखाद्या वरिष्ठ आणि नावाजलेल्या अभिनेत्यासोबत नाव जोडलं जाणं हे अवघडून टाकणारं असतं. त्यांनी मला त्यांच्या मुलीसारखं वागवलं असतं," असं आयशा म्हणाली. आयशाने याच मुलाखतीत तिचं अरमान कोहलीबरोबर नातं होतं हे मान्य करतानाच आता आपला त्याच्याशी काहीही संबंध नसून त्याच्याबद्दल बोलण्याचीही आपली इच्छा नसल्याचं म्हटलं आहे.

Read More