Marathi News> मनोरंजन
Advertisement

35 तास चाललं 'या' मराठी मालिकेचं शूट, अनोख्या नवरात्री सीनसाठी कलाकारांची मेहनत

'मन उडु उडु झालं' ही मालिका प्रचंड गाजतेय आणि त्याचसोबत त्यातील इंद्रा आणि दिपूची जोडी देखील प्रेक्षकांना आवडतेय. 

35 तास चाललं 'या' मराठी मालिकेचं शूट, अनोख्या नवरात्री सीनसाठी कलाकारांची मेहनत

मुंबई : 'मन उडु उडु झालं' ही मालिका प्रचंड गाजतेय आणि त्याचसोबत त्यातील इंद्रा आणि दिपूची जोडी देखील प्रेक्षकांना आवडतेय. सध्या सगळीकडे नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतोय. त्यात ही मालिका कशी मागे राहील. 

या मालिकेत देखील प्रेक्षकांना नवरात्रीची धूम पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं कि दिपू अनवाणी नवरात्री साजरी करतेय आणि त्याच सोबत ती उपवास देखील करतेय. पण गरबा आणि दांडिया शिवाय नवरात्री अपूर्ण आहे आणि आता या मालिकेत प्रेक्षकांना दिपू आणि इंद्राचा गरबा आणि दांडिया देखील पाहायला मिळणार आहे.

 हा नवरात्री सिक्वेन्स शूट करण्यासाठी संपूर्ण टीमला चक्क 35 तास लागेल. या सिक्वेन्सच्या शूटिंगचे सगळे डिटेल्स एका बिहाईंड द सिन व्हिडिओमध्ये कैद करून ऋताने तो व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना हृता म्हणाली, " 35 तासांच्या शूटिंगची मेहनत ही अशी दिसते. पण शेवटी जेव्हा संपूर्ण सिक्वेन्स व्यवस्थित आणि छान शूट होतो तेव्हा आपण सगळा थकवा विसरून जातो. या सगळ्यासाठी संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली. मला अभिमान आहे कि मी मन उडु उडु झालं या कार्यक्रमाचा हिस्सा आहे."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे ती म्हणते," प्रेक्षकांनी अगदी कमी वेळात आम्हाला स्वीकारलं आणि आमच्यावर खूप प्रेम केलं आणि पुढेही करत राहतील. प्रेक्षक हा नवरात्री विशेष भाग नक्की एन्जॉय करतील याची मला खात्री आहे." हृता दुर्गुळेने संपूर्ण टीमचे आभार मनात कृतज्ञता देखील व्यक्त केली. मालिकेप्रमाणेच या व्हिडिओला देखील प्रेक्षक उदंड प्रतिसाद देत आहेत. मालिकेच्या टीमची मेहनत प्रेक्षकांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे यशस्वी होतेय असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही.

Read More