Marathi News> मनोरंजन
Advertisement

मनोज कुमार यांच्या कुटुंबात कोण कोण आहे? मुलाचा फ्लॉप अभिनेता ते बिझनेसमॅन होण्यापर्यंतचा प्रवास

Manoj Kumar's Family : मनोज कुमार यांच्या कुटुंबात कोण कोण आहे? त्यांचा मुलगा आता काय करतो जाणून घ्या...

मनोज कुमार यांच्या कुटुंबात कोण कोण आहे? मुलाचा फ्लॉप अभिनेता ते बिझनेसमॅन होण्यापर्यंतचा प्रवास

Manoj Kumar's Family : बॉलिवूड दिग्गज अभिनेता मनोज कुमार यांचं वयाच्या 87 व्या वर्षी निधन झालं. त्यांनी मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक दशकं इंडस्ट्रीमध्ये काम केलं असून अनेक दर्जेदार चित्रपट दिले. त्यांचं अचानक निधन झाल्यानं सगळ्यांना धक्का बसला आहे. त्यांच्या कुटुंबात कोण कोण होतं याविषयी जाणून घेऊया...

मनोज कुमार यांच्या पत्नीचं नाव शशि गोस्वामी आहे. 2013 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या लव्ह स्टोरीविषयी सांगितलं. त्यांनी सांगितलं की जेव्हा ते ग्रॅज्युएशन करत होते तेव्हा एक त्यांच्या एका मित्राच्या घरी ते गेले होते. तिथेच त्यांनी शशि यांना पाहिलं होतं. पाहताच क्षणी ते त्यांच्या प्रेमात पडले. जवळपास एक-दीड वर्ष मनोज कुमार हे शशि यांना लांबून पाहायचे. त्यानंतर मित्रांच्या मदतीनं ते कसेबसे 'उडनखटोला' हा चित्रपट पाहण्यासाठी गेले यावेळी त्यांचे मित्र देखील त्यांच्यासोबत आले होते.  

पुढे मनोज कुमार यांनी सांगितलं की त्यानंतर ते सतत एकमेकांना भेटू लागले आणि त्यांच्या कुटुंबाला देखील या नात्याला हरकत नव्हती. पण शशि यांचे भाऊ आणि आई यांना हे नातं मान्य नव्हतं. पण कॉलेजच्या टेरेसवर ते एकमेकांशी बोलायचे कारण तिथे त्यांच्याशी कोणी बोलू शकत नव्हतं. त्यानंतर त्यांचं लग्न झालं आणि 1961 मध्ये शशि यांनी एका मुलाला जन्म दिला आणि त्या मुलाचं नाव कुणाल ठेवलं. शशि यांनी सांगितलं की त्यांच्यात आणि मनोज कुमार यांच्यात खूप प्रेम होतं. पण त्या त्यांचा तितकाच आदर देखील करायच्या. मनोज यांचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं पण शशि यांना त्यांच्या नवऱ्यावर विश्वास होता. 

हेही वाचा : देशभक्तीपुढं पैसा काय चीज; निधनानंतर समोर आला मनोज कुमार यांच्या संपत्तीचा आकडा

मनोज कुमार यांचा मुलगा कुणार गोस्वामी आहे. त्यांनी देखील वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं पण त्यांना हवं तेवढं यश मिळालं नाही. ते चित्रपटसृष्टीत सुपरफ्लॉप ठरले कारण बॅक-टू-बॅक त्यांचं चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत गेले. ‘नीले-नीले अंबर पर चांद जब छाए…’ यात जो अभिनेता दिसला तो मनोज कुमार यांचा मुलगा होता. ते गाणं तर हिट झालं पण मुलाचं करिअर काही खास झालं नाही. त्यांनी काही चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर छोट्या पडद्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. पण तिथेही त्यांचं काही झालं नाही. कुणारनं कॅटरिंगचा बिझनेस सुरु केला. जो त्यांना प्रचंड आवडला. तर त्यांनी दिल्लीमध्ये कॅटरिंगचा बिझनेस सुरु केला आणि आज ते कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. अभिनय सोडून त्यांनी एक बिझनेसमॅन म्हणून स्वत: ची ओळख निर्माण केली.

Read More