Marathi News> मनोरंजन
Advertisement

घटस्फोट झालेल्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या बायकोकडून प्रेमाची कबुली

14 वर्ष एकत्र राहिल्यानंतर या प्रसिद्ध कपलने वेगळा होण्याचा मार्ग निवडला होता

घटस्फोट झालेल्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या बायकोकडून प्रेमाची कबुली

मुंबई : भोजपुरी अभिनेता मनोज तिवारीची एक्स पत्नी राणी तिवारी आजकाल पंजाबी गायक एकम बावाला डेट करत आहे. तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक रोमँटिक फोटो शेअर करून आपलं प्रेम जाहीर केलं आहे. हा फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर राणी तिवारीबाबत चर्चा सुरू झाली आहे. मनोज तिवारी आणि राणीचं लग्न 1999 मध्ये झालं होतं. 14 वर्षे एकत्र राहिल्यानंतर 2012 मध्ये ते वेगळे झाले.

राणी तिवारीने शेअर केला  रोमँटिक फोटो 
राणीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती एकम बावाच्या मागे उभी असल्याचं दिसत आहे. तर एकम दोघांचे सेल्फी घेत आहे. एकमने गुलाबी आणि पांढरा कॉम्बिनेशन टी-शर्ट घातला आहे तर दुसऱ्या फोटोत राणीही गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या कुर्तामध्ये दिसत आहे. तिने आपले केस मोकळे सोडले आहेत. या फोटोत राणी खूप सुंदर दिसत आहे. हे फोटो शेअर करत राणीने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "हृदयाची भावना नक्की वाचा, माझ्या प्रत्येक क्षणाला प्रेम करण्याचं वचन आहे. तू मेरी जान माझे हार्ट बीट"

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यासोबतच एकम बावाने मुलाखतीमध्ये बोलताना आपल्या नात्याबद्दल देखील सांगितलं, ती म्हणाली की, दररोज प्रेम वाटणं ही एक चांगली भावना आहे. तो माझ्यासोबत असल्याबद्दल देवाचे खूप आभार मानू इच्छिते. तर दुसरीकडे, मनोज तिवारी आधीच पुढे गेले आहेत. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव सुरभी तिवारी आहे. काही काळापूर्वी तो एका मुलीचे वडिल बनले आहेत. राणी आणि मनोज यांना जिया नावाची मुलगी देखील आहे.

Read More