Marathi News> मनोरंजन
Advertisement

धक्कादायक : अभिनेत्री मानसी नाईक घेणार घटस्फोट? सोशल मीडियावरुन हटवलं आडनाव

मानसी आणि तिच्या पतीमध्ये काही ठिक चालत नसल्याच्या बातम्या सध्या समोर येत आहे. मानसी लवकरच घटस्फोट घेणार असल्याचंही बोललं जातंय

धक्कादायक : अभिनेत्री मानसी नाईक घेणार घटस्फोट? सोशल मीडियावरुन हटवलं आडनाव

मुंबई : 'रिक्षावाला' या गाण्याने घरा-घरात पोहचलेली अभिनेत्री मानसी नाईक कायम चर्चेत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसोबत ती कायम फोटो आणि व्हिडिओ शेअर करते.  मानसी चित्रपटातून गायब असली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधताना दिसते. मात्र आता ती एका वेगळ्याच कारणामुळे नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आहे. यावेळी अभिनेत्री वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आहे. 

मानसी आणि तिच्या पतीमध्ये काही ठिक चालत नसल्याच्या बातम्या सध्या समोर येत आहे. मानसी लवकरच घटस्फोट घेणार असल्याचंही बोललं जातंय. त्याचं कारण आहे तिच्या सोशल मीडियावरील तिच्या आणि त्याच्या सगळ्या पोस्ट हटवल्या आहेत ऐवढंच नव्हेतर  मानसीने तिच्या इंस्टाग्रामवरील मानसी नाईक खरेरा हे नाव हटवून मानसी नाईक ठेवलंय. त्यामुळे आता या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. 

अभिनेत्री मानसी नाईकचा नवरा एक बॉक्सर आहे. मानसीने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून तिच्या आणि प्रदीपच्या लग्नाचे सर्व फोटो डिलिट केले आहेत. मानसीने बॉक्सर प्रदीप खरेरा सोबत २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली होती. दुसरीकडे प्रदीपने देखील त्याच्या अकाऊंटवरून त्यांचे सगळे फोटो काढून टाकले आहेत. त्याच्याही अकाउंटवर केवळ त्याचेच फोटो आहेत. आता यामुळे त्यांचे चाहते चिंतेत आहेत. त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला का असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. मात्र मानसी किंवा प्रदीपकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

मानसीसा पती प्रदीप खरेरा हा एक बॉक्सर आणि मॉडेल (Mansi Naik Husband Profession)आहे. बरीच वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी सप्तपदी घेण्याचा निर्णय घेतला होता. नेहमीच पतीसोबत फोटो शेअर करणारी मानसी गेल्या काही दिवसांपासून प्रदीपसोबतचे फोटो शेअर करत नसल्याचे काही नेटकऱ्यांच्या लक्षात आलं आहे.  मात्र आता त्यांच्या नात्याला कुणाचीतरी नजर लागली आहे. 

सोबतच त्यांचे सर्व रोमँटिक फोटो आणि फोटोशूट केलेल्या पोस्टही तिने काढून टाकल्या आहेत. इतकंच नाही तर तिने इन्स्टाग्राम अकाउंटवरील खरेरा हे आडनावही हटवलं आहे. यावरून त्यांच्यातील नातं किती बिघडलं आहे याचा अंदाज चाहत्यांना आला आहे.

Read More