Marathi News> मनोरंजन
Advertisement

'तोंड फिरवण्यापूर्वी स्वत:ला...', घटस्फोटांच्या चर्चांमध्ये 'हे' काय बोलून गेली Mansi Naik

Mansi Naik नं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. आता पुन्हा एकदा तिच्या घटस्फोटाची चर्चा सुरु झाली आहे. 

'तोंड फिरवण्यापूर्वी स्वत:ला...', घटस्फोटांच्या चर्चांमध्ये 'हे' काय बोलून गेली Mansi Naik

मुंबई : मराठी अभिनेत्री मानसी नाईक (Mansi Naik) ही तिच्या उत्तम नृत्यशैलीसाठी ओळखली जाते. मानसीचं ‘बघतोय रिक्षावाला’ (Baghtoy Rikshawala), ‘बाई वाड्यावर’ ही गाणी चांगलीच लोकप्रिय झाली होती. खरंतर या गाण्यांमुळे मानसीला घराघरात ओळख मिळाली. मानसी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत मानसी चाहत्यांच्या संपर्कात राहते. काही दिवसांपूर्वी मानसी आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. (Mansi Naik Husband Pradeep Kharera) दरम्यान, घटस्फोटाच्या चर्चेत मानसीनं सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

पाहा काय म्हणाली मानसी नाईक - 

मानसीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून एक स्टोरी शेअर केली आहे. काल मानसीचा पती प्रदीपचा वाढदिवस होता. त्या निमित्तानं मानसीनं एक पोस्ट शेअर केली आहे, 'आज मी माझ्या मोबाईलमधल्या काही गोष्टी डिलीट करत होते, तेव्हा प्रत्येक वेळी फोन मला विचारत होता Are You Sure म्हणजे नक्की ना….!! मला मोठे आश्चर्य वाटले की एक निर्जीव मशीन आपल्या आत साठवलेल्या आठवणी काढून टाकण्यापूर्वी तुम्हाला नक्की ना असं विचारते. मग एक जिवंत माणूस ज्याला भावना आहेत. इतका निष्काळजी व भावनाशून्य कसा राहतो. जो नातेसंबंध तोडण्यापूर्वी वा तोंड फिरवण्यापूर्वी स्वत:ला एकदाही विचारत नाही की Are You Sure म्हणजे नक्की ना !,' असे मानसीनं त्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

fallbacks
मानसी नाईकनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. (Photo Credit : Mansi Naik Instagram)

मानसीनं शेअर केलेली ही स्टोरी सध्या चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. मानसीच्या चाहत्यांना तिची ही स्टोरी वाचून धक्का बसला आहे. तिनं शेअर केलेल्या या इन्स्टाग्राम स्टोरीचे तिच्या खासगी आयुष्याशी काही संबंध आहे का? याबद्दल चर्चा सुरु आहेत. खरंच तिचा घटस्फोट होणार आहे का? असा प्रश्न देखील तिनं उपस्थित केला आहे. (mansi naik shared a post on husband pradeep kharera s birthday are they gone get divorced) 

कोण आहे मानसी नाईकचा पती प्रदीप खरेरा? 

मानसीसा पती प्रदीप खरेरा हा एक बॉक्सर आणि मॉडेल (Mansi Naik Husband Profession)आहे. बरीच वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी सप्तपदी घेण्याचा निर्णय घेतला होता. नेहमीच पतीसोबत फोटो शेअर करणारी मानसी गेल्या काही दिवसांपासून प्रदीपसोबतचे फोटो शेअर करत नसल्याचे काही नेटकऱ्यांच्या लक्षात आले आहे. फक्त मानसी नाही तर तिचा पती प्रदीप देखील नेहमीच मानसीसोबत फोटो शेअर करायचा. (Mansi Naik Husband Is Boxer and Model)आता त्याच्या अकाऊंटवरही मानसीचे फोटो दिसत नाही असे म्हणत काही नेटकऱ्यांनी ती विभक्त झाले का किंवा त्यांच्यात दुरावा आला का असा प्रश्न केला आहे. दरम्यान, त्या दोघांनी या बातमीला दुजोरा दिलेला नाही. मानसी आणि प्रदीप 19 जानेवारी 2021 रोजी लग्नबंधनात अडकले होते. 

Read More