Marathi News> मनोरंजन
Advertisement

मानुषी छिल्लरची नवी इनिंग सुरू

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने आपला मोर्चा आता चित्रपटांच्या बाजूने वळवला आहे.  

मानुषी छिल्लरची नवी इनिंग सुरू

मुंबई : मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने आपला मोर्चा आता चित्रपटांच्या बाजूने वळवला आहे. लवकरच ती अभिनेता अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार. 'पृथ्वीराज' चित्रपटाच्या माध्यमातून मानुषी अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमावणार आहे. चित्रपटाच्या शूटींग दरम्यानचा एक फोटो तिना ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. चित्रपटाच्या पहिल्या गाण्याची तयारी जोरात सुरू असल्याचं तिने पोस्ट केलेल्या फोटोच्या माध्यमातून समोर येत आहे. 

मानुषीचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे ती प्रचंड आनंदी आहे. ट्विटरवर फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ते माझ्या सोबत आहे' असं तिने लिहीले आहे. 'पृथ्वीराज' चित्रपट २०२० मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.

'पृथ्वीराज'या ऐतिहासिक चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी चक्क ३५ भव्य सेटची निर्मिती करण्यात आली आहे. महाराष्ट्रात आणि राजस्थानमध्ये या ऐतिहासिक सेटची निर्मिती होणार आहे. 'पृथ्वीराज महाकाव्या' भोवती चित्रपटाची कथा फिरताना चाहत्यांना अनुभवता येणार आहे.

तर खुद्द अक्षय त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. अक्षय चित्रपटात अक्षय पृथ्वीराज चौहान यांच्या भूमिकेला न्याय देणार आहे तर मानुषी त्यांची प्रेयसी संयोगिताच्या भूमिकेत झळकणार आहे. 

मिस वर्ल्ड २०१७चा किताब जिंकल्यानंतर आता मानुषी, संयोगिता म्हणून चाहत्यांचे मन जिंकते की नाही हे पाहणं औत्युक्याचं ठरणार आहे. 

Read More