Marathi News> मनोरंजन
Advertisement

'जोधा अकबर' फेम 'अकबर'च्या प्रेमात अनेक मुली, पण 'तो' या मुलीच्या प्रेमात

कोण आहे 'जोधा अकबर' फेम  अकबरच्या आयुष्यातील 'ती'

'जोधा अकबर'  फेम 'अकबर'च्या प्रेमात अनेक मुली, पण 'तो' या मुलीच्या प्रेमात

मुंबई : अभिनेता रजत टोकस... रजतने अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारत मुलींच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. पण रजतला 'जोधा अकबर' (Jodha Akbar) मालिकेच्या माध्यमातून लोतप्रियता मिळाली. आज रजतसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कारण आज त्याचा वाढदिवस आहे. 19 जुलै 1991 रोजी त्याचा जन्म मुनिरकामध्ये झाला. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेवू. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajat (@rajattokas19)

रजतने बाल कलाकाराच्या रूपात करियरची सुरूवात केली. टीव्ही विश्वात त्याने 'साई बाबा' मालिकेच्या माध्यमातून पदार्पण केलं. पण ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास अपयशी ठरली. त्यानंतर 'धरती का वीर योद्धा पृथ्वीराज चौहान' मालिकेमुळे त्याच्या करियरला कलाटणी मिळाली. आज देखील त्याच्या या मालिकेच्या चर्चा तुफान रंगत असतात.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajat (@rajattokas19)

त्यानंतर  'जोधा अकबर' मालिकेतील 'अकबर'च्या रजतच्या भूमिकेने सर्व मुलींना घायाळ केलं. अनेक मुली त्याच्या प्रेमात पडल्या. पण रजतच्या मनात मात्र आधीचं एका मुलीने घर केलं. त्या मुलीचं नाव आहे सृष्टी नय्यर. सृष्टी आणि रजतने 2015 साली गुपचूप लग्न केलं. दोघांनी उदयपूरमध्ये लग्न केलं. 

Read More