Marathi News> मनोरंजन
Advertisement

बी ग्रेड चित्रपटात झळकली होती मान्यता, बदनामीच्या भीतीवर संजय दत्तने हा उपाय काढला?

बॉलिवूडच्या जगात अशी अनेक कपल आहेत, जी लोकांना खूप आवडतात

बी ग्रेड चित्रपटात झळकली होती मान्यता, बदनामीच्या भीतीवर संजय दत्तने हा उपाय काढला?

मुंबई : बॉलिवूडच्या जगात अशी अनेक कपल आहेत, जे लोकांना खूप आवडतात, पण अशीही काही कपल आहेत ज्यांना प्रत्येकजण आइडल कपल मानतात. संजय दत्त आणि मान्यता दत्तची जोडी देखील लोकांसाठी एक उदाहरण आहे. 'रॉकी' चित्रपटाद्वारे मुख्य अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये प्रवेश घेतलेला संजय दत्त आपल्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल अशा दोन्ही गोष्टींमुळे चर्चेत राहिला आहे.

मान्यता ही संजू बाबांची तिसरी पत्नी आहे, पण या दोघांच्या बाँन्डिंगचं लोकं खूप कौतुक करतात. दोघांनी 2008 साली लग्न केलं. या दोघांना शाहरान आणि इकरा ही जुळी मुलं आहेत. जेव्हा जेव्हा संजय दत्त अडचणीत असतो तेव्हा-तेव्हा मन्याता त्याच्यासोबत खंबीरपणे उभी असते. मान्यताला चित्रपटांमध्ये झळकणं खूप आवडतं. तिने यासाठी खूप कष्ट देखील घेतले होते.

2003 मध्ये, मन्यताला प्रकाश झाच्या 'गंगाजल' चित्रपटात एक आयटम साँग मिळालं आणि ती या गाण्यामुळे प्रसिद्ध झाली. यानंतर मान्यताला बी ग्रेड आणि सी ग्रेड चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्या. 2005 साली तिन्हे 'लव्ह लाइक यू' या नावाचा शॉर्ट बी ग्रेड चित्रपट केला.

fallbacks

जेव्हा संजय दत्त मान्यताच्या आयुष्यात आला तेव्हा संजयला तिच्या या चित्रपटांबद्दल वाईट वाटलं. जेव्हा दोघांमध्ये प्रेम होते आणि लग्नाची चर्चा सुरू झाली, तेव्हा संजय दत्तला ही गोष्ट कळाली आणि त्याने या चित्रपटातील सीन हटवण्याचे प्रयत्न केला. अशा परिस्थितीत त्याने पत्नीचा बी ग्रेड चित्रपटाच 'लव्ह लाईक अस'चे राईट्स 20 लाख रुपयांत विकत घेतले. इतकंच नाही तर संजय दत्तने या चित्रपटाच्या सर्व सीडी व डीव्हीडी बाजारातून काढून घेण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र आता संजय आणि मान्यता सुखी आयुष्य जगत आहेत.

Read More