Marathi News> मनोरंजन
Advertisement

नशिबाच्या 'सेक्रेड गेम्स'विषयी अभिनेत्याचा मोठा खुलासा

एकिकडे देशभरात .... 

नशिबाच्या 'सेक्रेड गेम्स'विषयी अभिनेत्याचा मोठा खुलासा

मुंबई : एकिकडे देशभरात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचा वातावरण पाहायला मिळत असतानाच दुसरीकडे सोशल मीडियावर चर्चा रंगू लागली आहे ती म्हणजे एका अशा विश्वाची जे चाहत्यांसाठी जरा खास आहे. हे विश्व आहे 'गणेश गायतोंडे'चं. 

'सेक्रेड गेम्स' या वेब सीरिजच्या निमित्ताने गणेश गायतोंडे आणि गुन्हेगारी विश्वाची एक नवी बाजू प्रेक्षकांना पाहता आली. सीरिजच्या पहिल्या पर्वाला यश मिळाल्यानंतर साधारण वर्षभराच्या अंतराने दुसरं पर्व प्रदर्शित करण्यात आलं आहे. 
नवाजुद्दीन सिद्दीकी, कल्की केकला, पंकज त्रिपाठी, रणवीर शौरी यांच्यासोबतच मराठी अभिनेत्री अमृता सुभाष हीसुद्धा या सीरिजमध्ये दमदार भूमिकेत दिसत आहे. अमृतासोबत आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याचीही वर्णी या सीरिजमध्ये लागली आहे. 

अमृतासोबतच या सीरिजचा भाग असणारा अभिनेता आहे अमेय वाघ. खुद्द अमेयनेच या सीरिजमध्ये सरताज सिंग ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत एक फोटो पोस्ट करत ही बाब उघड केली. या सीरिजमध्ये काम करण्याती संधी मिळणं म्हणजे नशिबाने आपल्यासोबत केलेले 'सेक्रेड गेम्सच' आहेत, असं कॅप्शन देत त्याने ही पोस्ट केली. या दोन्ही कलाकारांच्या पोस्ट आणि एकंदरच या सीरिजची लोकप्रियता पाहता पुढचे काही दिवस 'सेक्रेड गेम्स २'चेच वारे कलाविश्वात वाहणार आहेत असंच म्हणावं लागेल. 

Read More