आज डॉक्टर दिन या दिवशी प्रत्येकजण आपल्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहेत. डॉक्टर अनेकांचे प्राण वाचवतात. अनेक दुर्धर आजार बरे करुन डॉक्टर रुग्णांना जीवनदान देतात. पण अनेकदा डॉक्टर रुग्णांची फसवणूक करतात त्यांचे पैसे उकळतात. असाच अनुभव पल्लवी अंशुमन विचारेला आला आहे.
महिलांमध्ये हार्मोन्स बदल होत असतात. या बदलावर आयुर्वेदिक उपचार करावे या उद्देशाने पल्लवी विचारे यांनी ठाण्यातील आय़ुर्वेदिक डॉक्टरकडे उपचार सुरु केले. पण यामध्ये पल्लवी विचारे यांना धक्कादायक अनुभव आला आहे. अक्षरशः हे उपचार पल्लवीच्या जीवावर बेतल्याचं दिसून येत आहे.
"डॉक्टरांचा मूर्खपणा"....आणि अभिनेता अंशुमन विचारेच्या पत्नीची तब्येत ढासळली...अंशुमन विचारे याची पत्नी पल्लवी नुकतीच एका धक्कादायक घटनेतून सुखरूप बाहेर पडली आहे. ठाण्याच्या एका आयुर्वेदिक डॉक्टर महिलेने पल्लवीवर चुकीचे उपचार केले यामुळे पल्लवी या बेशुद्ध पडल्या. हार्मोनल चेंजेसमुळे पल्लवी यांना काही त्रास होत होते.
अलोपॅथिक गोळ्यांमुळे अधिक त्रास होऊन नये म्हणून तिने आयुर्वेदिक उपचार घेण्याचे ठरवले. ठाण्यातील एक आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेल्यानंतर पहिल्या व्हीजीटला ३५०० हजार रुपये दिले त्यात काही गोळ्या देण्यात आल्या. दुसऱ्या व्हिजिटला पंचकर्म ट्रीटमेंट करावी लागेल म्हणून ५०-६० हजार रुपये घेतले. योग्य डाएट देण्यासाठी ब्लड टेस्ट करावी लागेल असे पल्लविला सांगण्यात आले. ब्लड टेस्टसाठी एक सुई लावण्यात आली आणि इंजेक्शनने ब्लड घेतील असं पल्लविला वाटलं पण १० मिनिटं एका कॅप्सूल पॉटमध्ये ते रक्त काढण्यात आलं.
या एवढया वेळात ते पॉट जवळपास पाऊणभर झालं होतं. एवढं रक्त काढताना ते डॉक्टर पल्लवीपासून ही गोष्ट लपवून ठेवत होते. त्यामुळे ही उपचाराची पद्धत चुकीची वाटते असं जेव्हा पल्लविला जाणवलं तेव्हा तिने अंशुमनला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये फोन करून बोलावलं. त्यादरम्यान मात्र पल्लवि बेशुद्ध पडली. ती महिला डॉक्टर पल्लवीच्या छातीवर दाब देऊन तिला उठवत होती.
अंशुमन काळजीने डॉक्टरांना विचारू लागला तेव्हा ' ते रक्त पाहून पल्लवी घाबरली आणि बेशुद्ध पडली घाबरू नका ' एवढंच त्यांनी सांगितलं. पण यानंतर मात्र पल्लविला भरपूर उलट्या झाल्या. डॉक्टरांनी पल्लविला घरी न्यायला सांगितलं. तेव्हा रात्रभर तिची अवस्था अस्वस्थ करणारी होती. दुसऱ्या दिवशी पल्लवीने फॅमिली डॉक्टरकडे धाव घेतली. घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा डॉक्टरांनी तिला शांत केले आणि ६% एवढंच रक्त शरीरात असल्याचं टेस्टमध्ये कळलं. साधारण ५ टक्के पेक्षा कमी रक्त शरीरात असतं तेव्हा अटॅक येण्याची शक्यता असते. पण फॅमिली डॉक्टरांनी केलेल्या उपचारानंतर पल्लवी आता या संकटातून सुखरूप बाहेर पडली आहे.
कुठलंही ज्ञान नसताना डॉक्टरांच्या त्या चुकीमुळे माझा जीव गेला असता अशी तक्रार पल्लवीने सोशल मीडियावर केली आहे. गेले महिनाभर मी बेडवर पडून होते, पण अंशुमनने माझी खूप काळजी घेतली मला व्यवस्थित खाऊ घातलं आणि आता मी पूर्ण रिकव्हर होऊन व्यायाम करायला आलेय असे पल्लवी सांगते. आज राष्ट्रीय डॉक्टर दिवस आहे आणि पल्लवीने सांगितलेली ही घटना नक्कीच प्रत्येकाला विचार करायला लावणारी आहे.