Marathi News> मनोरंजन
Advertisement

'अग्गंबाई सासूबाई' मालिकेतील हा कलाकार झळकणार नव्या मालिकेत, प्रोमो आला समोर

'घरोघरी मातीच्या चुली' असे या मालिकेचे नाव आहे. याचा प्रोमोही समोर आला आहे. 

'अग्गंबाई सासूबाई' मालिकेतील हा कलाकार झळकणार नव्या मालिकेत, प्रोमो आला समोर

Gharoghari Matichya Chuli Promo : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांच्या यादीतील एक मालिका म्हणून 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेला ओळखले जाते. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील बबड्या आणि शुभ्रा जोडीला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळाले. या मालिकेत बबड्या हे पात्र अभिनेता आशुतोष पत्कीने साकारले होते. तर शुभ्रा या भूमिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान झळकली होती. आता लवकरच अभिनेता आशुतोष पत्की एका नव्या मालिकेत झळकणार आहे. याचा प्रोमोही समोर आला आहे. 

अभिनेता आशुतोष पत्की हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतचं आशुतोषने इन्स्टाग्रामवर एका मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत अभिनेत्री रेश्मा शिंदे ही प्रमुख भूमिकेत झळकत आहे. याच मालिकेत आशुतोष पत्की झळकणार आहे. 'घरोघरी मातीच्या चुली' असे या मालिकेचे नाव आहे. या मालिकेत आशुतोष पत्की हा सौमित्र रणदिवे हे पात्र साकारणार आहे. 

आशुतोष साकारणार वकिलाची भूमिका

'घरोघरी मातीच्या चुली' या नावातच मालिकेची खरी गोष्ट दडलेली आहे. घर म्हटलं तर छोट्या मोठ्या कुरबुरी या कायमच असतात. मात्र घराला खऱ्या अर्थाने घरपण मिळतं ते घरातल्या आपल्या माणसांमुळे. याच आपल्या माणसांची गोष्ट म्हणजे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका असणार आहे. यावरच या मालिकेचे कथानक आधारित आहे. सौमित्र ही भूमिका साकारण्यासाठी आशुतोष फारच उत्सुक आहे. 

या भूमिकेविषयी सांगताना आशुतोष म्हणाला, ‘स्टार प्रवाहच्या दुर्वा मालिकेत मी एक छोटी भूमिका साकारली होती. इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीसोबत काम करायला मिळतंय याचा आनंद आहे. सौमित्र रणदिवे हा वकील आहे. अतिशय हुशार, महत्वाकांक्षी आणि व्यावहारिक. एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेला आणि नात्यांचं महत्त्व जाणणारा. मी याआधी साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा अतिशय वेगळं असं हे पात्र आहे. या मालिकेची टीमही उत्तम आहे. त्यामुळे काम करताना धमाल येते, अशी भावना आशुतोषने व्यक्त केली आहे.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

दरम्यान या मालिकेत अभिनेत्री सविता प्रभुणे, रेश्मा शिंदे, प्रमोद पवार, उदय नेने, प्रतिक्षा मुणगेकर, भक्ती देसाई, सुनील गोडसे असे कलाकार झळकणार आहेत. स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती सुचित्रा आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने केली आहे. या मालिकेचे दिग्दर्शन राहुल लिंगायत करत आहेत.

Read More