Marathi News> मनोरंजन
Advertisement

'सचिन पिळगावकर हे खूप...', जयवंत वाडकरांनी सांगितला आपला अनुभव; म्हणाले 'मी एकदा विचारलं तुम्ही...'

Jaywant Wadkar on Sachin Pilgaonkar: ज्येष्ठ मराठी अभिनेते जयवंत वाडकर यांनी सचिन पिळगावकर यांच्यासोबत काम करण्याचा आपला अनुभव सांगितला आहे. सचिन पिळगावकर फार महान व्यक्तिमत्व असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.   

'सचिन पिळगावकर हे खूप...', जयवंत वाडकरांनी सांगितला आपला अनुभव; म्हणाले 'मी एकदा विचारलं तुम्ही...'

Jaywant Wadkar on Sachin Pilgaonkar: सचिन सर तर ग्रेट माणूस आहेत असं सांगत ज्येष्ठ मराठी अभिनेते जयवंत वाडकर यांनी कौतुक केलं आहे. जयवंत वाडकर यांनी सचिन पिळगावकर यांच्यासोबत काम करण्याचा आपला अनुभव सांगितला आहे. सचिन सर सेटवर अभिनेते, स्पॉट बॉय सर्वांना समान वागणूक देतात. ही त्यांची जमेची बाजू असून, हेच त्यांच्या यशाचं कारण आहे असंही त्यांनी 'लोकशाही मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. 

सचिन पिळगावकर यांच्यासोबत काम करण्याच्या अनुभवावर त्यांनी सांगितलं की, "मी आयत्या घरात घरोबामध्ये पहिलं काम केलं. आमच्यासारखे आम्हीच मध्ये आम्ही होतो. पण आमची नावं नंतर कट झाली. त्यानंतर नवरा माझा नवसाचा तर आजही सुपरहिट आहे. दुसरी फिल्मही खूप चालली. त्यांचा अनुभव म्हणजे ते फार उत्साही आणि सकारात्मक आहेत".

"मी एकदा त्यांना विचारलं की, 9 च्या शिफ्टला नाश्ता का मागवत आहात? कारण आपल्याकडे 9 च्या शिफ्टला कुठेच नाश्ता नसतो. त्यावर ते म्हणाले, वाड्या आपण 9 वाजता बोलवतो तेव्हा हे तंत्रज्ञ, स्पॉटबॉय पहाटे कधीतरी घरातून निघालेले असतात. त्यांना खायला मिळालं पाहिजे. नाश्ता मिळाल्यानंतर ऊर्जा मिळते आणि मग ते आनंदाने काम करतात. मग त्यांना एक तास उशिरा सोडलं तरी काही बोलत नाहीत".

पुढे ते म्हणाले, "सचिनजी जे आपण खातात, तेच आपल्याला देतात. इतर ठिकाणी कलाकारांना वेगळं, इतरांना वेगळं दिलं जातं. पण ते म्हणतात, जे मी खाणार तेच सगळ्यांनी खायचं. ही त्यांची जमेची बाजू असून, हेच त्यांच्या यशाचं कारण आहे".

अशोक सराफ यांच्याबद्दलचा अनुभव सांगताना ते म्हणाले, "अशोकमामा फार कडक आहेत. काही अॅडिशन घ्यायच्या नाहीत हा त्यांचा नियम होता. जर काही घ्यायच्या असतील तर आधी त्यांना सांगून, रिहर्सल करुन मग घेतल्या जात असत. जर इकडचं तिकडं केलं तर मग गेला तो. आजही ते प्रचंड शिस्तप्रिय आहेत. आजही ते अर्धा तास लवकर पोहोचून आपले डायलॉग पाठ करत बसलेले असतात. हे असं कुठे दिसणार नाही".

Read More