Marathi News> मनोरंजन
Advertisement

'प्रमुख भूमिकेसाठी फायनल झालो पण...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत

त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने त्याच्या नव्या भूमिकेचा फोटो पोस्ट केला आहे. 

'प्रमुख भूमिकेसाठी फायनल झालो पण...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत

छोट्या पडद्यावरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने 25 वर्षांचा लीप घेतला आहे. त्यामुळे या मालिकेतील अनेक पात्रांची एक्झिट पाहायला मिळत आहे. याच मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून कपिल होनरावला ओळखले जाते. कपिलने या मालिकेत मल्हार हे पात्र साकारले होते. त्याच्या या पात्राला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता पुन्हा एकदा कपिल हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने स्वत: याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे. 

कपिल होनराव हा सध्या सोशल मीडियावर सक्रीय असतो. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मधून कपिलची एक्झिट झाल्यापासून तो कोणत्या नव्या भूमिकेत झळकणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. आता त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने त्याच्या नव्या भूमिकेचा फोटो पोस्ट केला आहे. यात तो टीशर्ट, ब्लेझर आणि जिन्स अशा लूकमध्ये दिसत आहे. 

कपिल होनरावची पोस्ट

"परत आलोय तुमचं मनोरंजन करण्यासाठी. 17 नोव्हेंबरला मल्हार म्हणून तुमचा निरोप घेतल्यानंतर. पुढे काय? हा प्रश्न होताच. , आता आपण लिड रोल करावा हीच मनात ,इच्छा ठेवून तशी तयारी करत होतो. वर्कआउट , डायट, मराठी डिक्शन आणि स्वतःवर काम करत होतो. तस एक दोन जागी lead म्हणून फायनल झालो ही होतो, पण काही कारणास्तव ते फायनल नाही होऊ शकल.

असो‌‌ तुमच love and support असेल तर. एक ना दिवस lead ‌नक्की करेनच आणी सुख मधून निरोप घेतल्यानंतर , तसेच रोल ऑफर होत होते. जवळपास चार-पाच भुमिकेला नाही , म्हटल्या वर हा रोल ऑफर झाला . एक निगेटिव्ह भूमिका मी कधीच केली नव्हती . म्हणून ह्या भूमिकेला मी लगेच हो म्हणालो . मल्हारला प्रेम दिलत तसंच या भूमिकेला पण द्या. तुमच प्रेम असंच सोबत असू द्या आणि बघत रहा निवेदिता माझी ताई", असे कपिल होनरावने म्हटले आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kaapil Honrao (@kapilhonrao)

कपिलने ही पोस्ट शेअर करत मालिकेचा एक प्रोमोही पोस्ट केला आहे. कपिल हा ‘निवेदिता माझी ताई’ या मालिकेत झळकणार आहे. यात तो खलनायकाचे पात्र साकारणार आहे. ‘निवेदिता माझी ताई’ या नव्या मालिकेत अभिनेता अशोक फळदेसाई, अभिनेत्री एतशा संझगिरी आणि बालकलाकार रुद्रांश चोंडेकर हे कलाकार भूमिकेत झळकत आहेत. यात अशोक फळदेसाई हे ‘यशोधन’ पात्र साकारत आहे. तर एतशा ही या मालिकेत ‘निवेदिता’ आणि रुद्रांश या मालिकेत ‘असीम’च्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

Read More