Marathi News> मनोरंजन
Advertisement

'तिथे पुन्हा काम करणार नाही', निलेश साबळेचे मोठं विधान

सध्या निलेश साबळे हा ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या कलर्स मराठी वाहिनीवरील कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'तिथे पुन्हा काम करणार नाही', निलेश साबळेचे मोठं विधान

Nilesh Sabale Interview : उत्तम अभिनेता, सूत्रसंचालक म्हणून लोकप्रिय असलेला निलेश साबळे हा कायमच काही ना काही कारणांनी चर्चेत असतो. एका लोकप्रिय कॉमेडी कार्यक्रमामुळे निलेश साबळे प्रसिद्धीझोतात आला. त्याचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. तो कायमच त्याच्या खासगी आणि वैयक्तिक आयुष्यातील घटना, किस्से आणि घडामोडी शेअर करत असतो. आता निलेश साबळेने एका विनोदी कार्यक्रमाबद्दल भाष्य केले आहे.

सध्या निलेश साबळे हा कलर्स वाहिनीवरील ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या कार्यक्रमात झळकत आहे. यानिमित्ताने निलेश साबळेने खासगी वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत निलेश साबळेने एका विनोदी कार्यक्रमात झळकण्याबद्दल वक्तव्य केले. त्यामुळे तो चर्चेत आला आहे.  

"मी पुन्हा करणार नाही"

यावेळी त्याला तो विनोदी कार्यक्रम पुन्हा सुरु होणार का आणि त्यात तू झळकणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर निलेश साबळे म्हणाला, "जर तो कार्यक्रम परत सुरु झाला, तर मी त्यात काम करणार नाही. कारण जेव्हा आपण एखादी गोष्टी वारंवार करतो, तेव्हा त्याचा कंटाळा येतो. म्हणजे जर 'बाहुबली' चित्रपटाचा पहिला पार्ट आला तर प्रेक्षक त्यावर प्रेम करतील, दुसऱ्यावर करतील पण तिसऱ्या भागाला कदाचित प्रेक्षक कंटाळून जातील. त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच भूमिकेत दिसलो तर प्रेक्षकही कंटाळतील. त्यामुळे मी पुन्हा तो कार्यक्रम करणार नाही."

या कार्यक्रमाबद्दल आम्हाला चॅनलकडून सांगण्यात आलं होतं की, "जानेवारीमध्ये कार्यक्रम बंद करुन तो ऑगस्टमध्ये पुन्हा सुरु करायचा. पण आता तो सुरु होणार की नाही, याबद्दल मला कोणतीही कल्पना नाही", असेही निलेश साबळेने म्हटले. 

विनोदाचे तीन हुकमी एक्के झळकणार

दरम्यान सध्या निलेश साबळे हा ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या कलर्स मराठी वाहिनीवरील कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमातून विनोदाचे तीन हुकमी एक्के झळकणार आहेत. या विनोदी कार्यक्रमाचं लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा निलेश साबळे सांभाळणार आहे. तर डॉ. निलेश साबळेसोबतच भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे विनोदसम्राट या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. 

Read More