संकर्षण कऱ्हाडेने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत अभिनेता नेहमीप्रमाणे अतिशय मोकळेपणाने बोलला आहे. यावेळीही त्याने प्रत्येकाला अंर्तमुख करायला लावलं आहे. आणि यावेळेचा विषय आहे, 'आई अन् तिच्या हातचं जेवण'. संकर्षणने आईच्या जेवणाचील पावित्र्य जगासमोर उलगडलं आहे. संकर्षणने सांगितलं आहे की, माझी आई जी स्वयंपाक करते, त्यासारखं पावित्र्यच येणं नाही.
पुढे जाऊन संकर्षण सांगतो की, जर मी व्हेंटिलेटरवर असेन आणि कुणी मला येऊन सांगितलं की, आईने जेवणं केलं आहे. तर मी दहा मिनिटं तरी उठेन आणि जेवून पुन्हा व्हेंटिलेटरवर जाईन. संकर्षणने सांगतो की, आजही तो आईच्या हातचं जेवताना रडतो. हवं तर तुम्ही घरी विचारा.
संकर्षण म्हणतो की, आईच्या जेवणाच्या हातचे पावित्र्यच येणे नाही. माझी आई स्वयंपाक करताना जी दिसते, ते पावित्र्यच येणे नाही. तिने रोजच्या जेवणातली हिरव्या टमाट्याची चटणी, गरम पापुद्रा निघालेली पोळी, गवारीची शेंगाची भाजी, साधं वरण, त्याला कडीपत्त्याचीही फोडणी नाही आणि भात असा जर वाढला.. तर मी रोज रडतो जेवताना. रोज. हे तुम्ही आता फोन लावून बाबांना, बायकोला किंवा कुणालाही विचारू शकता. माझ्या डोळ्यात रोज पाणी येतं. की हे काय आहे.. हे परब्रह्म आहे,” अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या.
संकर्षणने मदर्स डेच्या दिवशी आईसाठी एक खास पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये त्याने आईबद्दलच्या आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या होता. आई प्रत्येकासाठीच खास असते. पण माझी आई माझ्यासाठी अतिशय पवित्र व्यक्तीमत्व आहे.
“आपण Unsung Hero म्हणतो ना काही लोकांना, तसं ते आहे. त्या स्वयंपाकाविषयी फार बोललं जात नाही, पण ते दैवी आहे. प्रत्येकालाचा आपली आई प्रिय असते. पण माझी आई तर… काय की बाबा! म्हणजे मी तिला म्हणतो सुद्धा, तू जेव्हा जाशील. तेव्हा स्वर्गातही तुला बहुतेक देवांच्याकडे स्वयंपाक घरातच ठेवतील. ते म्हणतील की, तुम्ही स्वर्गात इथं काम करा आणि आम्हाला खाऊ घाला.”