Marathi News> मनोरंजन
Advertisement

'सिम्बा'च्या सेटवर सिद्धार्थ जाधवचं बर्थ डे सेलिब्रेशन : व्हिडिओ

पाहा हा व्हिडिओ

'सिम्बा'च्या सेटवर सिद्धार्थ जाधवचं बर्थ डे सेलिब्रेशन : व्हिडिओ

मुंबई : बर्थ डे म्हटला की त्याचं खास सेलिब्रेशन हे आलंच. असंच काहीस खास सेलिब्रेशन आपल्या सर्वांचा आवडता अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या वाढदिवसाचं झालं आहे. सिद्धार्थ जाधवचा नुकताच 23 ऑक्टोबर रोजी 37 वा वाढदिवस साजरा केला आहे. या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन सिम्बाच्या सेटवर झालं. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

या व्हिडिओत सिद्धार्थ जाधव सिम्बाच्या सेटवर आहे. यावेळी अभिनेता रणवीर सिंह, दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि सिम्बाची संपूर्ण टीम आहे. या व्हिडिओची सुरूवात 'बार बार दिन ये आए...' या गाण्याने झाली आहे. या गाण्यावर सिद्धार्थ आणि रणवीर सिंह नाचताना दिसत आहे. तसेच मागच्या बाजूला दिवाळीतील फटाके आणि पाऊस लावून याचं खास सेलिब्रेशन केलं आहे.

भरपूर सेलिब्रेशन झाल्यानंतर सिद्धार्थ मराठमोळ्या पद्धतीने आपल्या भावना व्यक्त केल्या. सिद्धार्थ म्हणतो की, हा माझ्यासाठी खास दिवस आहे. 13- 14 वर्षांनतर मी पुन्हा एकदा रोहित शेट्टी सरांसोबत काम करत आहे. माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे.. I Love You Sir.. म्हणत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

Read More