Amruta Khanvilkar : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर नुकतीच केदारनाथ आणि बद्रीनाथची यात्रा पू्र्ण केली आहे. यावेळी तिच्यासोबत अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील होती. काही दिवसांपूर्वीच दोघींनी त्याचे केदारनाथ आणि बद्रीनाथ यात्रेचे फोटो शेअर केले होते. जे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. दोघींनी केदारनाथ यात्रेचा अनुभव शेअर केला आहे.
दरम्यान, केदारनाथ यात्रेवरून अमृता खानविलकर नुकतीच मुंबईत परतली आहे. मात्र, तिची प्रकृती बिघडली असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. सध्या अमृता खानविलकर ही डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे उपचार घेत आहे. तसेच तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने केदारनाथ यात्रेला जाण्यापूर्वी काय काळजी घ्यावी याबद्दल चाहत्यांनी सांगितलं आहे.
काय म्हणाली अमृता खानविलकर?
नमस्कार, मी नुकतीच केदारनाथ आणि बद्रीनाथ यात्रेवरून मुंबईत परतली आहे. मुंबईत येताच माझी तब्येत बिघडली असून मी प्रचंड आजारी पडली आहे. मला सलाईन लावावं लागलं. केदारनाथमध्ये डोले गोळी घेऊन मी तसेच दिवस काढले. मात्र, आता जर कोणी केदारनाथला जाणार असेल तर त्यांना मी आवर्जून सांगने की, जर तुम्हाला केदारनाथ मंदिराच्या येथे जायचे असेल तर जाण्यापूर्वी तुम्हाला शरीराची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण केदारनाथ मंदिर हे समुद्रसपाटीपासून 11,000 फूट उंचीवर आहे. त्यामुळे तिथे गेल्यावर अनेक समस्या येतात.
सुरुवातीला जाताना काही वाटत नाही. परंतु, ट्रेक करून खाली परत येताना खूप त्रास होतो. मला देखील खूप त्रास झाला. शेवटचे चार किलोमीटरमध्ये जे झालं ते मी तुम्हाला सांगूही शकत नाही. सध्या मला दुसरा कोणताही त्रास होत नाही पण माऊंटेन सिकनेस अजून आहे. त्यामुळे जर कोणीही केदारनाथला जात असेल तर त्यांनी जवळ ORS ठेवावी. तसेच इतर गोळ्या देखील ठेवाव्यात. पाण्याची बॉटल देखील ठेवावी. तसेच वर जात असताना प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये.
सर्वात महत्त्वाचं वरती जात असताना घाईगडबड करू नका. जाताना जसे वातावरण आहे तसा प्रवास करा. मंदिराच्या येथे गेल्यानंतर लगेच खाली येऊ नका. तिथे एक दिवस राहा. दर्शन घ्या. नंतर खाली या. आम्ही गेलो तेव्हा पाऊस नव्हता. आमचं नशीब चांगलं होतं. त्यामुळे कसलीही दगदग झाली नाही. पण वातावरणाचा खूप त्रास झाला. आमची यात्रा खूप सुंदर झाली आणि ती खूप आव्हानात्मक होती. जेवढी वाटते तितकी हा यात्रा सोपी नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगळा असेल पण हा मला आलेला अनुभव मी शेअर केलाय असं तिने सांगितले.