Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्री मयुरी देशमुखच्या नवऱ्याची आत्महत्या

 मयुरी देशमुखच्या नवऱ्याने आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त 

अभिनेत्री मयुरी देशमुखच्या नवऱ्याची आत्महत्या

मुंबई : मराठीतील छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मयुरी देशमुखच्या नवऱ्याने आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आलंय. नवोदित अभिनेता आशुतोष भाकरे याने नांदेडमध्ये त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाहीय. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. 'भाकर' आणि 'इचार ठरला पक्का' सिनेमातून काम केलंय.

आशुतोष हा गेले काही दिवस तो तणावातून जात होता. काही दिवासांपुर्वी त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये लोकं आत्महत्या का करतात ? हा आशय होता. पण आशुतोष या निर्णयापर्यंत जाईल असा कोणी अंदाज लावला नव्हता. 

अभिनेत्री मयुरी देशमुख ही खुलता खळी खुलेना या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचली.२१ जानेवारी २०१६ ला मयुरी आणि आशुतोष यांनी लग्न केलं होतं. 

Read More